लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! खात्यात खटाखट पैसे जमा होण्यास सुरुवात

0

मुंबई । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दरमहा 1500 रुपये जमा करण्यात येत असतात. आतापर्यंत एकूण १० हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आले आहेत. आता मे महिन्याचा म्हणजेच ११वा हप्ता कधी जमा होणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. अशातच मे महिन्याचं हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

आजपासून महिलांच्या खात्यात मे महिन्याचा सन्मान निधी वितरीत केला जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी स्वतः दिली आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

मे महिना उलटून गेला तरीही खात्यात १५०० रुपये जमा न झाल्याने महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मे महिन्याचा हप्ता कधी येणार, जूनच्या हप्त्याचं काय असे प्रश्न विचारले जात होते. दरम्यान, आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याचे स्वतः आदिती तटकरेंनी सांगितले आहे.

बँक खात्यात पैसे आले का ? असं तपासा स्टेटस
लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाल्यास तुम्हाला तुमच्या बँकेकडून एसएमएस (SMS) येईल.
बँकेकडून एसएमएस न आल्यास तुम्ही बँकेच्या बॅलन्स चेक क्रमांकावर एसएमएस पाठवून किंवा टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल करुन तुमच्या बँक खात्यातील रकमेच्या संदर्भात जाणून घेऊ शकता.
तुमच्याकडे स्मार्टफोन असेल आणि नेट बँकिंग, गुगल पे, फोन पे वापरत असाल तर बँक बॅलन्स तपासू शकता.
डेबिट कार्ड असल्यास एटीएममध्ये जाऊन लास्ट ट्रान्झॅक्शन हिस्ट्री पाहू शकता.
तसेच बँकेत जाऊन तुम्ही आपल्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही हे तपासू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.