लाडक्या बहिणींनो.. आजचं ई-केवायसी करा, अन्यथा 1,500 रुपयांचा लाभ विसरा??

0

मुंबई । राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेची देशभरात चर्चा सुरु असून या योजनेमुळे महायुती सरकारला निवडणुकांमध्ये खूप फायदा झाला. दरम्यान शासनाने या योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य केली आहे. मात्र अजूनही 1 कोटीपेक्षा जास्त महिलांनी ई-केवायसी पूर्ण केलेले नाही. त्यामुळे १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी न केल्यास लाभातून त्या महिलांना वगळले जाईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सध्या 10 दशलक्षाहून अधिक महिलांची ई-केवायसी प्रलंबित आहे. म्हणूनच 18 नोव्हेंबरपर्यंत सर्वांचे ई-केवायसी पूर्ण न झाल्यास, सरकार या प्रक्रियेसाठी मुदतवाढ देऊ शकते. यानंतरच 1,500 रुपयांची रक्कम त्यांच्या बँक खात्यांत जमा केली जाईल.

ई-केवायसी करण्यास किती वेळ लागतो?
लाडकी बहिण योजनेचे ई-केवायसी करणे अत्यंत सोपे असून काही मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण होते. यासाठी जवळच्या अंगणवाडी केंद्रात, सेतू केंद्रात किंवा तहसील कार्यालयात जाऊ शकता. अंदाजे 2.5 कोटी महिलांनी नोंदणी केली असून त्यातील फक्त 1.3 कोटी महिलांनीच ई-केवायसी पूर्ण केले आहे. दरम्यान, अजून १ कोटी महिलांचे केवायसी बाकी आहे त्यामुळे त्यांचा लाभ बंद होणार का अशी भीती लाभार्थी महिलांच्या मनात निर्माण झाली आहे.

ई-केवायसी कसे करावे?
सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा: ladakibahin.maharashtra.gov.in
होमपेजवर eKYC या पर्यायावर क्लिक करा.
फॉर्ममध्ये आपला आधार क्रमांक भरा आणि कॅप्चा कोड टाका.
‘Yes, I agree’ वर टिक करून Send OTP बटण दाबा.
आधार-लिंक मोबाइलवर आलेला OTP टाकून सबमिट करा.
जर तुमचे ई-केवायसी आधीच झाले असेल तर “eKYC is already done” असा संदेश दिसेल. ई-केवायसी बाकी असल्यास, सिस्टीम तुमचा आधार योजनेच्या यादीत आहे का ते तपासेल. क्रमांक नोंदणीत असल्यास पुढील स्टेप उघडेल.
पुढे पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक भरा, कॅप्चा टाका, OTP घ्या आणि सबमिट करा.
आपल्या जात श्रेणीची निवड करा.
दोन घोषणांवर टिक करा:
कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरी किंवा सरकारी निवृत्तीवेतन घेत नाही.
कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे.
सर्व तपशील तपासून Submit करा.
अखेरीस स्क्रीनवर “Success: Your e-KYC verification has been successfully completed” असा संदेश दिसेल.

Leave A Reply

Your email address will not be published.