लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर !!! आजपासून बँक खात्यावर १५०० रुपये जमा होणार

0

मुंबई । ऑक्टोबर महिन्याचा हप्ता खात्यावर कधी जमा होणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लाडक्या बहि‍णींमध्ये उत्सुकता होती. अखेर, ही प्रतिक्षा संपली आहे. लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आजपासून १५०० रूपयाचे वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

टप्याटप्प्याने पुढील दोन दिवसात सर्व पात्र महिल्यांच्या खात्यात १५०० रूपये जमा होणार आहेत. बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे. याशिवाय त्यांनी १८ नोव्हेंबरपर्यंत सर्व महिलांनी केवायसी करण्याचे आवाहन देखील केले आहे.

मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ई केवायसीबाबत माहिती दिली. महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरचा आधी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी, असे तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

तांत्रिक अडचणी दूर

लाडकी बहिण योजनेसाठी E-KYC करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पण मधल्या काळात E-KYC करत असताना अनेक अडचणींना सामना करावा लागत होता. E-KYC करताना OTP येत नसल्याचं उघड झालं होतं. अनेक महिलांनी याबद्दल तक्रार केली होती. त्यानंतर आदिती तटकरे यांनी याची दखल घेतली. तांत्रिक अडचणी दूर होऊन E-KYC प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुकर करण्यात आली आहे. Ladki Bahin Yojana Update |

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै २०२४ मध्ये झाली असून, पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. तर, ज्या शेतकरी महिला ‘नमो शेतकरी महासन्मान’ आणि ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेचा लाभ घेतात, त्यांना या योजनेतून दरमहा ५०० रुपये मिळतात.

Leave A Reply

Your email address will not be published.