मोठी बातमी! लाच घेणाऱ्या मुख्याध्यापकाला जळगावच्या एलसीबीने रंगेहात पकडले

0

जळगाव। १० हजाराची लाच घेणाऱ्या मुख्याध्यापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली असून कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.संदीप प्रभाकर महाजन (वय-४४, रा. निपाणे ता. एरंडोल) असं मुख्याध्यापकाचं नाव आहे.

एरंडोल तालुक्यातील एका गावातील शाळेत तक्रारदार हे शिपाई म्हणून पदावर नोकरीला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे वेतनातील फरकाची रक्कम रक्कम २ लाख ५३ हजार ६७० रुपये मंजूर करण्याचा प्रस्ताव त्यांनी जळगाव माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक त्यांच्याकडे पाठवला होता. दरम्यान हा प्रस्ताव मंजूर करून देतो असे सांगून शाळेचे मुख्याध्यापक असणारे संदीप महाजन यांनी मंजूर रकमेच्या ५% म्हणजे १२,५०० रुपयांची लाचेची मागणी केली.

दरम्यान तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव येथील विभागाला तक्रार दिली. त्यानुसार पथकाने गुरुवारी २७ जून रोजी दुपारी सापळा १० हजाराची रक्कम स्वीकारताना मुख्याध्यापक संदीप महाजन यांना पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी कासोदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आली आहे. सापळा पर्यवेक्षक अधिकारी पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पो.नि.एन.एन.जाधव,पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील,पो.हे.कॉ. सुरेश पाटील,पो.हे.कॉ.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ.शैला धनगर, पो.ना.बाळू मराठे,पो.कॉ.प्रणेश ठाकूर, पोना.किशोर महाजन,पो.ना. सुनिल वानखेडे,पो.कॉ.प्रदीप पोळ,पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी,पो.कॉ. सचिन चाटे यांनी कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.