जळगाव जिल्हा परिषदेतील लिपिकाला लाच घेताना अटक

0

जळगाव । जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ लिपिक नरेंद्र किशोर खाचणे (वय ५२) याला शिपाई पदावरून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर बदली झाल्यानंतर तक्रारदाराला बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी तडजोडीअंती १ लाख ८० हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.या कारवाईने मोठी खळबळ उडाली

तक्रारदार हे २६ वर्षीय असून ते जळगावात राहतात. तक्रारदार हे लोकसेवक असून तक्रारदार यांची सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्र, यावल येथे शिपाई पदावर नोकरी होती. तेथे ते कार्यरत होते. नंतर त्यांची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर रावेर पंचायत समिती येथे बदली झाली होती. बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी वरिष्ठ लिपिक नरेंद्र किशोर खाचणे (वय ५२) यांनी २ लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदारांनी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागकडे तक्रार केली होती.

तक्रारीनुसार बुधवार दि. २१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी पडताळणी केली असता वरिष्ठ लिपिक नरेंद्र खाचणे यांनी पंचासमक्ष तडजोडीअंती १ लाख ८० हजार रुपयाची लाचेची मागणी करून स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहात अटक करण्यात आले आहे. त्यांच्यावर शनीपेठ पोलीस स्टेशन, जळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जिल्हा परिषदेत या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.