सावद्यात कुलसुमबाई अख्तर हुसेन मंगल कार्यालय लॉजिंगचा दिमाखात उद्घाटन सोहळा

0

सावदा :- येथील सुप्रसिध्द व हरहुन्नरी दानशूर व्यक्ती विषेश व प्रत्येकांशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केलेले सावदा एच.पी. पेट्रोल पंपाचे मालक शब्बीर हुसेन अख्तर हुसेन उर्फ बाबू सेठ यांचे उभारलेल्या भव्य असे कुलसूमबाई अख्तर हुसेन मंगल कार्यालय कोचूर रोड सावदा येथील सर्व सुविधा युक्त २१ वातानुकूलित(एसी)नविन अद्ययावत रुम तथा लॉजिंगचा उद्घाटन सोहळा दि.२३ जून रोजी दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आला होता.

या वातानुकूलित २१ एसी रूम लॉजिंगचा उद्घाटन संतप्त रत्न महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज गादीपती संतप्त संस्था फैजपूर यांचे शुभहस्ते करण्यात आले.तर या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मानेकर मोठे बाबा सुरेशराज शास्त्री गादीपती महानुभव मंदिर सावदा व कोठारी शास्त्री भक्ती किशोर दाजी श्री स्वामीनारायण मंदिर सावदा हे उपस्थित होते.

या दिमाखदार उद्घाटन सोहळ्या प्रसंगी रावेर-यावल तालुक्याचे आमदार शिरीष चौधरी,माजी मंत्री एकनाथराव खडसे,
सावदा न.पा.माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे,बाबुशेठ यांचे चिरंजीव(सीए)जाफर शब्बीर हुसेन,डॉ.शहरबानो अख्तर हुसेन, कुर्बान मेंबर फैजपूर,माजी नगरसेवक सुधा पाटील,सुनील पाटील,मनोज वसंतराव पाटील, समाजसेवक सोहेल खान,निसार अहमद,अतुल नेहते,जुजर अली अब्बास अली,व सदरील अद्ययावत मंगल कार्यालय लॉजिंग रुमचे सुप्रसिद्ध आर्किटेक भावेश डांग भुसावळ सह सावदा व परिसरातील प्रत्येक क्षेत्रातील नामवंत मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच दि.२३ जून रोजी उद्योजक शब्बीर हुसेन अख्तर हुसेन उर्फ बाबू सेठ यांचा वाढदिवस असल्याने या लॉजिंग उद्घाटन सोहळ्यात त्यांच्या वाढदिवस देखील मोठ्या जल्लोषमय वातावरणात येथे साजरा करण्यात आला.यावेळी सर्वसामान्य सह त्यांचे सर्व कर्मचारी मंडळी,मित्रपरिवार आणि उपस्थित मान्यवरांनी बाबू सेठ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.यामुळे येथे आनंदाचा वातावरण पाहवयास मिळाला.हे मात्र खरे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.