.. तर मी राजीनामा देण्यास तयार ; कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचं स्पष्टीकरण
मुंबई । राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात मोबाईलमध्ये ऑनलाइन रमी गेम खेळताना व्हिडिओ व्हायरल झालाय. ऑनलाइन पत्ते खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचा पत्ता कट होणार का? असा सवाल सर्व स्तरातून विचारला जात आहे. अशातच यावर आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिले
मला रमी खेळताच येत नाही. तसे आढळले तर मी राजीनामा देण्यास तयार असल्याचे कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याशिवाय राजीनाम्याच्या मागणीवर कोकाटे म्हणले तितका मोठा विषय आहे का? राजीनामा द्यायला मी काय विनयभंग केला आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. विधानभवनात काय करायचं, ते मला चांगलेच कळते, असेही कोकाटे म्हणाले.
नाशिक येथे पत्रकार परिषदेत माणिकराव कोकाटे बोलत होते. विधिमंडळात ऑनलाइन गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकारण तापले होते. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. माणिकराव कोकाटे यांच्या या व्हिडिओवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनील तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याशिवाय अजित पवार यांनी त्यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेत राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले. दोषी आढळलो तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईल. राजीनामा देण्यासारखं काही घडलेच नाही, असे कोकाटे म्हणाले.