धुळ्यात काँग्रेसला धक्का: माजी आमदार कुणाल पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
मुंबई: धुळे ग्रामीणचे काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी आज (दि.१) आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री रविंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. पाटील यांचा भाजप प्रवेश हा धुळे जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.
धुळे येथील पाटील घराणे ७० वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ होते. कुणाल पाटील यांचे आजोबा कँग्रेसचे खासदार होते. तर दिवंगत वडील रोहीदास पाटील यांनी अनेक खात्यांचे मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती.