अखेर महायुतीचं खातेवाटप ठरलं; कसे असेल खातेवाटपं?

0

नागपूर : काही दिवसांपूर्वी महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र अद्याप खातेवाटप झाले नसल्याने अनेकांचे लक्ष त्याकडे लागले आहे. तसेच कोणाला कोणते खाते मिळणार? यासाठी रस्सीखेंच पाहायला मिळत आहे.

यातच महायुतीचं खातेवाटप अखेर ठरलं आहे. महायुतीच्या खातेवाटपावर येत्या २४ तासांत अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण खातेवाटपाची यादी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना देणार आहे. त्यामुळे राज्याचे नवे मंत्री लवकरच कामकाजाला लागणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीचे खातेवाटप ठरल्याची माहिती येत आहे. येत्या २४ तासांत महायुतीच्या खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. शिवसेना आज रात्रीच यादी मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांची यादी उद्या दिली जाणार आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या दोन दिवसांत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना संपूर्ण खातेवाटपाची यादी देणार आहे.

कसे असेल महायुतीचं खातेवाटपं?
गेल्या मंत्रिमंडळातील महत्वाची खाती त्या त्या पक्षाकडेच राहणार आहे. भाजपकडे गृह खाते राहणार आहे. तर शिवसेनेकडे नगरविकास खाते राहणार आहे. दुसरीकडे अजित पवार गटाचे अर्थ खाते कायम राहणार आहे. भाजपकडे महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, उर्जा खाते राहणार आहे. शिवसेनेचे उत्पादन शुल्क खाते हे राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं जाणार आहे. भाजपच्या वाटेचे गृहनिर्माण शिवसेनेच्या ताब्यात जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.