खालापूरमध्ये श्री अम्मा भगवान मंदिरासाठी स्थलशुद्धी हवन; हजारो भक्तांची उपस्थिती

0

रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे श्री अम्मा भगवान मंदिराच्या निर्माणाधीन कार्याच्या निमित्ताने श्री भगवाना‍चा ७७ वा वाढदिवस सोहळा आणि स्थलशुद्धी हवन विधी या प्रसंगी, परम पूज्य अरविंद दासाजी, समाजसेवक श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर थानावाला श्री दिनेशभाई ठककर, मालाड आणि श्री अजयभाई हजारोंच्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.

परम पूज्य अरविंद दासजी हे एक आध्यात्मिक गुरु आणि प्रवचनकार म्हणून ओळखले जातात. ते भक्ती, नामस्मरण, सत्संग आणि धार्मिक कार्यांद्वारे समाजात आध्यात्मिक जागृती घडवून आणतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रम, यज्ञ, मंदिरनिर्माण आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात. श्री अम्मा भगवान यांच्या पवित्र मंदिराचे निर्माणकार्य सध्या सुरू असून हे कार्य अत्यंत पवित्र आणि समाजोपयोगी आहे. मंदिर हे केवळ दगड-मातीचे बांधकाम नसून ते श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक उन्नतीचे केंद्र असते. येथे भविष्यात नामस्मरण, सत्संग, कीर्तन, प्रवचन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. “मंदिर निर्माण हे महान पुण्यकर्म आहे.”

या पुण्यकार्यात सहभागी होऊन आपण आपल्या जीवनात आध्यात्मिक समाधान आणि ईश्वरी कृपा प्राप्त करू शकतो. या प्रसंगी, समाजसेवक श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर थानावाला यांनी आपल्या भाषणात सांगितले की, कोणतेही मंदिर असो, एन.के.टी. ट्रस्ट तन्मनधनाने सहकार्य करते. १०० ब्राह्मणांकडून आहुती देण्यात आली होती. या यज्ञामुळे अमंगलातून मंगल निर्माण होईल, याबद्दल कोणतीही शंका नाही. अनेक लोक येथे येत असतात. भव्य मंदिराचे निर्माणकार्य सुरू आहे. हे पवित्र कार्य लवकरात लवकर पूर्णत्वास जावो, ही श्री अमामा भगवान चरणी प्रार्थना.

Leave A Reply

Your email address will not be published.