कवी श्री गजानन गेडाम यांच्या व्यसनमुक्ती अभियानात कवितेचा सन्मान

0

गडचिरोली | 
२३ आक्टोबर २०२४ रोजी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ शाखा गडचिरोली व सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या नशाबंदी मंडळ चंद्रपूर / गडचिरोली च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी साप्ताहा निमित्त गडचिरोली येथील गुरुदेव सेवा मंडळ परिसरात व्यसनांची भयावहता व व्यसनमुक्ती* या विषयावर झाडीबोली साहित्य मंडळाचे चे कवी संमेलन घेण्यात आले. यामध्ये झाडीबोली साहित्य मंडळाचे सदस्य श्री गजानन भिकाजीं गेडाम यांनी व्यसनापायी बरबाद ही कविता झाडीबोलीत सादर केली. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाच्या माध्यमातून सुरु असलेल्या नशामुक्त माहाराष्ट्र अभियानात कविसंमेलन या उपक्रमात सहभाग घेत समाज प्रबोधन व जनजागृती पर कविता सादर केल्याबद्दल गजानन गेडाम यांना महाराष्ट्र शासनाच्या नशाबंदी मंडळातर्फे प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामगिताचार्य बंडोपंत बोढेकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्राद्यापक विनायक धानोरकर तर प्रमुख अतिथी म्हणून झाडीबोली साहित्य मंडळाचे माजी अध्यक्ष तथा एकतीस व्या झाडी बोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ पुरुषोत्तम लेनगुरे होते. तसेच आयोजक व प्रमुख पाहुणे म्हणून श्री संदीप कटकूरवार जिल्हा संघटक नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य हे होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री उपेंद्र रोहणकर यांनी तर आभार प्रदर्शन राठोड यांनी केले.कविसंमेलनाला २५ कवि व कवयित्री यांनी सहभाग नोंदविला आणि उत्तम आणि दर्जेदार कविता सादर केल्यागेल्या आणि महाराष्ट्र शासनाच्या नशाबंदी मंडळा तर्फे सर्व सहभागी कवी कवयित्री यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

ज्यांमध्ये गजानन गेडाम यांचा देखिल सन्मान करण्यात आला.श्री गजानन गेडाम हे झाडी बोली साहित्य मंडळ गडचिरोली चे सदस्य असून, विविध सामाजिक संघटनाच्या व अस्तित्व संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असतात. व शासकीय राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग नोंदवत असतात. त्यांना या आधी सामाजिक कार्यकारिता विविध पुरस्कार प्राप्त झालेले असून त्यांनी जनजागृती सह ३१ वेळा रक्तदान केले हे विशेष.

Leave A Reply

Your email address will not be published.