जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार, या पक्षात जाण्याची चर्चा?

0

लोकसभा निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्राता फोडाफोडीचा खेळ रंगला होता. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन प्रबळ फुटले. त्यांच्यात उभी फुट पडली, एवढेच काय मुळ पक्षांना आपले नाव आणि निवडणूक चिन्हही गमवावे लागले. मध्यंतरी शांतता होती.

लोकसभा निवडणूक संपन्न झाली आणि आता पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पळवापळवीच्या प्रकाराला सुरूवात होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याची सुरूवात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटापासून होणार असल्याचा दावा केला जातो आहे.

त्याचे कारण म्हणजे शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कॉंग्रेसमध्ये जाणार असल्याचा दावा अजित पवार यांच्या पक्षाच्या एका नेत्याने केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या दाव्याला भारतीय जनता पार्टीचे नेते प्रविण दरेकर आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनीही दुजोरा दिला असल्याचे समजते. अजित पवार गटाच्या सूरज चव्हाण यांनी एक व्हिडिओच जारी केला आहे. त्यानुसार शरद पवार गटाचे अनेक नेते अजित पवारांवर विश्‍वास ठेवून त्यांच्याकडे येणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यातच ते असेही म्हणतात की प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे स्वत:च कॉंग्रेसमध्ये जाणार आहेत.

जयंत पाटलांनी राहुल गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली असून त्यांचा कॉंग्रेस प्रवेशाचा मुहुर्तही ठरला आहे. ४ जूननंतर शरद पवारांचा पक्ष रिकामा होणार असल्याचे भाकित व्हिडिओत करण्यात आले आहे. वास्तविक अजित पवार यांनी पक्षात फूट पाडण्याच्या अगोदरच जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या सातत्याने येत होते.अजित पवारांच्या बंडामुळे कदाचित जयंतरावांचे समीकरण बिघडले असावे. तथापि, आता शरद पवार गटात फारसे भवितव्य नसल्याचे त्यांनाही ठाऊक असल्यामुळे ते पक्षांतराचा निर्णय घेऊ शकतात असे भाजपचे प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.

तर उद्धव ठाकरे गटाची जी स्थिती झाली तीच आता शरद पवार यांच्या पक्षाची होते आहे असा दावा शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी केला आहे. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्या हाताखाली काम करणे जयंत पाटील यांना मानवणार नाही अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.