जामनेर शहरात कारमध्ये गॅस भरताना स्फोट; सुदैवाने जीवितहानी टळली

0

जळगाव : जामनेर शहरात अवैध पद्धतीने चारचाकी गाडीत गॅस भरण्यात येत असताना सिलेंडरचा मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आज घडली. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. सुदैवाने, या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु संबंधित चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

जळगाव जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरमधून रिक्षा व गाड्यांमध्ये गॅस भरण्याचे अवैध प्रकार सुरु आहेत. यासाठी काही ठिकाणी छुप्या पद्धतीने दुकान टाकून हा अवैध धंदा चालविला जात आहे. अशातच जामनेर शहरात चारचाकी वाहनामध्ये सिलेंडरमधून अवैधरित्या गॅस भरण्याचे काम सुरु होते. या प्रयत्नादरम्यान मोठा अपघात घडला असून गॅस सिलेंडर अचानक स्फोट झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासात गॅस भरण्याचे काम बेकायदेशीररीत्या सुरू असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी संबंधित दुकानदार आणि गॅस भरणाऱ्या वाहनधारकावर कारवाई केली. मात्र या प्रकारामुळे जामनेर शहरात अवैध गॅस भरण्याच्या व्यवसायावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून नागरिकांनीही याविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.