कवी कट्टा निसर्ग सहल जांभूळ बेट येथे जाणार
केरवाडी विज्ञान केंद्र येथे भेट देणार लेखक साहित्यिक कलावंतांनी सहभागी होण्याचे आवाहन नांदेड: कवी कट्टा हा लोकप्रिय व्हाट्सअप साहित्यिक चळवळ असून अनेक साहित्यिक ऑनलाईन आणि ऑफलाईन उपक्रमाने लोकप्रिय ठरली आहे.कवी कट्टा समूहाची साहित्यिक निसर्ग सहल दरवर्षी निघत असते. या वर्षी ही सहल दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी रविवारी परभणी जिल्ह्य़ातील पालम तालुक्यातील ‘जांभूळ बेट’ या निसर्गरम्य वातावरणात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जाणार आहे तसेच केरवाडी येथील विज्ञान केंद्रास भेट देणार आहे
कवी कट्टा या व्हाट्सअप समूहाच्या माध्यमातून एकत्रित आलेल्या साहित्यिक साहित्यप्रेमी यांना एकत्रित येता यावे आणि त्यातून विचारांची देवाण-घेवाण व्हावी या प्रामाणिक उद्देशाने गेल्या अनेक वर्षापासून ही सहल कवी कट्टा समूहाच्या वतीने काढली जाते. या अगोदर ही सहल सहस्रकुंड, केदारगुडा,कंधार, माहूर, बासर इत्यादी ठिकाणी गेली असून कवी साहित्यिक लेखकांना आनंददायी आणि उत्साह निर्माण करणारी सहल म्हणून ठरली आहे.कविता, गाणी, गप्पा, गझल आणि नृत्यांचा मनमुराद आनंद देणारी ही सहल सर्वांना आवडणारी असून प्रचंड प्रतिसाद याही वर्षी मिळत आहे.
या आनंददायी सहलीत कवी,लेखक, साहित्यिक आणि साहित्य प्रेमी तसेच विविध कलावंत सहभागी होत आहेत.दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी रविवारी ही सहल कला मंदिर परिसरातून निघणार आहे. या सहलीला शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवल्या नंतर ही सहल ‘जांभूळ बेट’ कडे रवाना होणार आहे. निसर्गाचा अनमोल ठेवा असलेल्या या परिसरातील सहलीसाठी नांदेड जिल्ह्यातील आणि परिसरातील साहित्यिक आणि साहित्य प्रेमींनी सहभागी व्हावे. असे आवाहन कवी कट्टा समूहाचे संचालक अशोक कुबडे तसेच दत्ता वंजे यांनी केले आहे.