जळगावसह राज्यात थंडी आणखी वाढणार; आजपासून पुढील ४ दिवस पारा आणखी घसरणार
जळगाव । राज्यात काही दिवसांपासून गायब झाली कडाक्याची थंडी जाणवायला लागली आहे. सकाळी आणि रात्रीच्या वेळेस हुडहुडी भरणारी थंडी जाणवत असली तरी दुपारच्या वेळेस उन्हाचा उकाडा जाणवत आहे. दरम्यान जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी आजपासून पुढील ४ दिवस पारा आणखी घसरणार असून ज्यामुळे थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे.
राज्यात धुळ्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. धुळ्यात ५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर गोंदिया मध्ये ८.२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. राज्यात आजपासून पारा 17 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. ही स्थिती पुढील आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.


विदर्भातही थंडीची लाट कायम असून नागपूर, गोंदिया, भंडाऱ्यात पारा १० अंशाच्या खाली गेलाय..हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार 11 डिसेंबरपर्यंत देशभरात थंडीची लाट कायम राहील ..त्यामुळे नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं.
धुळ्यात थंडीचा जोर वाढला
धुळ्यात तापमानाचा पारा घसरला आहे. आज धुळ्यामध्ये 5.4° c तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वात नीचांकी तापमान मानलं जात आहे. तापमानामध्ये प्रचंड घट झाल्यामुळे धुळेकरांनाचांगलीच हुडहुडी देखील भरली आहे. गेल्या काही दिवसांपासून धुळ्याच्या तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात घट जाणवत असल्याचे दिसून येत आहे. सातत्याने तापमानामध्ये घट होत असल्यामुळे त्याचा परिणाम आता धुळ्याकरांवर होताना दिसून येत आहे.
गारठा आजपासून वाढणार, पारा चार दिवस ८ ते ११ अंश राहणार
जळगाव शहरासह जिल्ह्यात ८ ते १२ डिसेंबर या कालावधीत किमान तापमान ८ ते ११ अंश राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातून येणारे थंड वारे जोरात मध्य महाराष्ट्राकडे वाहत असल्याने गारठा अधिक वाढल्याचे जाणवते. वातावरण अंधुक किंवा ढगाळ, भौगोलिक भाषेत या स्थितीला ‘हेझ’ म्हणतात. धुके व कोरड्या वाऱ्यांमुळे जळगावचा पारा आजपासून पुढील चार दिवस ८ ते ११ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. अर्थात, गारठा वाढेल. रविवारी पारा १२.२ अंशांवर होता. सोमवारी रेडिएटिव्ह फॉगमुळे दृश्यमानता ४०० मीटरपर्यंत खाली येईल आणि सरासरी किमान तापमान ११ अंशांपेक्षाही खाली येऊ शकते, असा स्थानिक हवामान अभ्यासकांचा अंदाज आहे.