पत्नीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करून पतीची रेल्वेखाली आत्महत्या; जळगाव तालुक्यातील घटना

0

जळगाव : दारूच्या नशेत पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करून त्यानंतर स्वतः धावत्या रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील बोरनार येथे मंगळवारी (दि. 19) घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली

याबाबत असे की, जळगाव तालुक्यातील बोरनार येथील प्लॉट एरिया परिसरात आनंदा महारू धनगर वय ४२ हे आपल्या पत्नी रेखा आणि विनोद आणि पप्पू या दोन मुलांसह वास्तव्याला होते. मंगळवारी १९ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता आंनदा यांचे पत्नी रेखासोबत किरकोळ वाद झाला. या वादातून आनंदाने पत्नी रेखा यांच्यावर लोखंडी कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात रेखा धनगर गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

पत्नीवर हल्ला केल्यानंतर आनंदा धनगर यांनी सकाळी ७ वाजता थेट म्हसावद रेल्वे गेटजवळ येवून धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात सध्या या घटनेची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर पती-पत्नीमधील या टोकाच्या वादामुळे आणि पतीने घेतलेल्या या आत्मघातकी पावलामुळे परिसरातील नागरिक हादरले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.