जळगावातील पाऊस सुट्टीवर ; जिल्ह्यात ५ ते ६ ऑगस्टपर्यंत दमदार पावसाची शक्यता

0

जळगाव । राज्यात पावसाचा जोर कमी झाला असून काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडत आहेत. मात्र सर्वदूर जोरदार पाऊस नाही. राज्यात पुढील ५ दिवस ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवड्यात काही ठिकाणी हलक्या ते जोरदार सरी पडतील. इतर भागात पावसाची उघडीप राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात मागच्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे खरिप पिकांना थोडाफार दिलासा मिळाला होता. पण आता जळगावकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आलीय. कारण आगामी दिवस जिल्ह्यात पाऊस ब्रेक घेणार असून यादरम्यान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. बुधवारी एकाच दिवसात तापमानाचा पारा ३ अंशानी वाढलेला दिसून आला

आगामी दिवस पावसाने उसंती घेणार असून यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जळगाव जिल्ह्ह्यात २०२४ मध्ये ३० जुलैपर्यंत ३८५ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदाच्या ३० जुलै २०२५ पर्यंत फक्त २४४ मिमी पाऊस झाला. यंदाच्या पावसात तब्बल १४१ मिमीने घट झाली. दरम्यान आता जोरदार पावसाकडे शेतकऱ्यांचं लक्ष असणार आहे.

अशातच हवामान खात्याने ५ ते ६ ऑगस्टपर्यंत दमदार पावसाची शक्यता कमी असल्याचा इशारा दिला आहे. पुढील ५-६ दिवस जोरदार पावसाची शक्यता नाही तर वातावरण ढगाळ आणि तुरळक पावसाची शक्यता आहे.तापमान पावसामुळे कमी झालेलं तापमान पुन्हा वाढतंय

Leave A Reply

Your email address will not be published.