लोकसभा निवडणूक । जळगाव आणि रावेरमध्ये सकाळी ११ पर्यंत इतके टक्के मतदान
जळगाव : राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. जळगाव आणि रावेरसह एकूण 11 लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा मतदार संघाचे सकाळी 7 ते 11 पर्यंतचे मतदान टक्केवारी समोर आली आहे.
जळगाव -16.89 % मतदान झाले
रावेर -19.03 % मतदान झाले
दरम्यान जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार करण पवार लोकसभेच्या रिंगणात आहेत. तर, रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून रक्षा खडसे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून श्रीराम पाटील लोकसभेच्या रिंगणात आहेत.