जळगावात बॉडी मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्री; ४ महिलांची सुटका

0

जळागावातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी कारवाई करत देहविक्रीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार महिलांची सुटका करण्यात आली असून, दोघा परप्रांतीय आरोपींवर पिटा अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जळगाव शहरातील नयनतारा ऑक्रिड मॉल येथील एका मसाज पार्लर देहविक्रीचा प्रकार सुरू होता. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. संबंधिक व्यक्तीने त्याला बॉडीमसाजसोबत इतर अनैतिक सेवांचे आमिष दिले. याची माहिती त्याने पोलिसांना दिली.

पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचला. तसेच छापा टाकून चार महिलांना ताब्यात घेतलं. छाप्यावेळी मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्री होत असल्याचे समोर आले. पोलिसांनी महिलांची सुटका करून त्यांना स्थानिक संरक्षण गृहात पाठवण्यात आले. तर, पार्लर चालवणाऱ्या दोघा परप्रांतिय आरोपींवर पिटा अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंजवण्यात आला आहे.

देहविक्रीवर या अनैतिक व्यवसायावर जळगावचे शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल भवारी, एलसीबीचे उपनिरीक्षक शरद बागल, सपोनी शितल कुमार नाईक, उपनिरीक्षक महेश घायतळ, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.