उत्साही कार्यकर्ता खांद्यावर उचलायला गेला, पण तोल गेला अन् आमदार पडले; व्हिडिओ व्हायरल

0

जळगाव । गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…चा जयघोष करत गणपती बाप्पाला मंगळवारी निरोप देण्यात आला. अनेक ठिकाणी मिरवणुकीत राजकीय नेते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. जळगाव शहरात निघालेल्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे सहभागी झाली होते.

यावेळी आमदार अन् मंत्र्यांनी देखील ठेका धरत गणेशभक्तांचा उत्साह वाढवला. पण यादरम्यान, एका उत्साही कार्यकर्त्यामुळे जळगावचे आमदार सुरेश भोळे खाद्यावरुन पडले. परंतु सदैव चांगले होते, त्यांना काही दुखापत झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


जळगाव शहरात सार्वजनिक गणेश मंडळाच्या मुख्य विसर्जन मिरवणुका रात्री उशिरापर्यंत चालल्या. जळगावात एकूण 75 पेक्षा जास्त सार्वजनिक गणेश मंडळ मिरवणुकीत सहभागी झाले होते. वाजत गाजत जल्लोषात गणरायास निरोप देण्यात आला. शहरातील मेहरून तलावावर सार्वजनिक गणेश मंडळांनी बाप्पाचे विसर्जन केले. ढोल ताशांचा गजरात वाजत गाजत पुढच्या वर्षी लवकर या जयघोष करत लाडक्या बाप्पाला गणेश भक्तांनी मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात निरोप दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.