जळगाव महापालिकेच्या निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर
जळगाव । जळगाव महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी वॉर्ड आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. एकूण १९ प्रभागांसाठी झालेल्या या सोडतीत अनेक प्रभागांमध्ये महिला आरक्षणाचा समावेश करण्यात आला. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर महानगर पालिकेच्या निवडणुका होत असल्याने जळगावकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
जळगाव महानगरपालिकेसाठी निवडून देण्यात येणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या ७५ इतकी आहे. या जागांचे प्रभागनिहाय व प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले.प्रत्येक प्रभागातून चार नगरसेवक निवडले जाणार आहेत, त्यापैकी किमान एक जागा महिला राखीव ठेवण्यात आली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागासवर्ग तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील पुरुष आणि महिला यानुसार आरक्षणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न यामध्ये दिसून येतो.


दरम्यान, आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता शहरातील कोणत्या प्रभागात कोण उमेदवार पुढे येणार? पक्षांमध्ये तिकीट वाटप कसे होणार? यावरून गट-तट, पक्षांतर्गत चर्चा आता वाढण्याची शक्यता आहे. महिला उमेदवारांची संख्या यंदा लक्षणीय वाढण्याचे संकेत या आरक्षणातून मिळत आहेत.