जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीला धक्का; सर्वच जागांवर महायुती उमेदवारांचा विजय निश्चित
जळगाव । आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागत असून हाती आलेल्या कलानुसार जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीला धोबीपछाड झाले असून महायुतीला सर्व जागांवर आघाडी असून विजय निश्चित मानला जात आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाचा आज निकाल जाहीर झाला आहे. यात राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. राज्यात यंदा होत असलेली निवडणुकीत जनतेचा कल कोणाकडे असेल याबाबत चर्चा रंगत होत्या. अर्थात महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट लढत सगळीकडे पाहण्यास मिळत होती. मात्र निकालानंतर महायुतीलाच स्पष्ट बहुमत मिळाल्याचे पाहण्यास मिळत असून जळगाव जिल्ह्यात देखील हीच परिस्थिती राहिली आहे.
भाजप, शिंदे गटाला ५-५ जागांवर विजय
जळगाव जिल्ह्यात जागा वाटप करताना भाजपला ५, शिवसेना शिंदे गट ५ आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला एक जागा मिळाली होती. जिल्ह्यात शंभर टक्के यश मिळाले आहे. अर्थात महायुतीने जिल्ह्यात दिलेल्या सर्व जागांवर विजय मिळविता आला आहे. यात जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून भाजपचे सुरेश भोळे, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपचे मंगेश चव्हाण, भुसावळ विधानसभा मतदारसंघातून भाजपचे संजय सावकारे, जामनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे गिरीश महाजन, तर रावेर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अमोल जावळे यांनी काँग्रेसचे शिरीष चौधरी यांना मागे टाकून आघाडी घेतली आहे.