जळगाव महापालिकेच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज
जळगाव । जळगाव महापालिका निवडणुकीसाठी मतदान १५ जानेवारी रोजी व मतमोजणी १६ जानेवारी रोजी होत आहे. ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे.
जळगाव शहराच्या महानगरपालिकेचा जर विचार केला तर 75 जागांसाठी ही निवडणूक असून यामध्ये 12 उमेदवार हे बिनविरोध झालेले आहेत 63 जागांसाठी 321 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहे.


या पार्श्वभूमीवर वखार महामंडळाच्या गोडाऊन मधून मतदानासाठी लागणारे ईव्हीएम मशीन व साहित्य वाटप होत आहे जळगाव शहराच्या मतदान प्रक्रियेसाठी 3055 अधिकारी व कर्मचारी यांची निवड करण्यात आली आहे
महानगरपालिका प्रशासनातर्फे मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनासह समन्वय साधण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.