जळगाव जिल्हयात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

जळगाव । बांगलादेशी हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ, सकल हिंदु समाज तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या बंदला आज जळगाव जिल्हयात उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. यादरम्यान सकाळी जळगाव शहरात सकल हिंदु समाजाच्या वतीने निषेध मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

सकल हिंदू समाजातील सर्व व्यापारी मंडळ, फुले मार्केट, गोलाणी मार्केट, बि.जे मार्केट , दाणा बाजार , गांधी मार्केट, शहरातील सर्व छोटे मोठे व्यापारी संकुल, एमआयडीसी परिसरातील लघुउद्योग भारती, जिंदा ,भाजप उद्योग आघाडी तसेच जिल्ह्यातील विविध व्यापारी व विक्रेते संघटना तसेच शाळा महाविद्यालय , कोचिंग क्लासेस , फुटपाथ विक्रेते, सर्वांनी एकमताने या घटनेचा निषेध म्हणून एक दिवस कडकडीत दुकाने व व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने बंद शंभर टक्के यशस्वी झाला.

सकाळी साडेनऊ वाजता सुभाष चौक येथील भवानी माता मंदिर परिसरात मोठ्या संख्येने हिंदू समाजातील विविध संघटनेतील व्यक्तींनी एकत्र येऊन भवानी मातेची आरती करण्यात आली. त्यानंतर सकाळी 10.30 शांततेत मोर्चाला सुरुवात झाली.मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. मोर्च्याची सुरुवात सुभाष चौक – दाना बाजार-टॉवर चौक ,शिवतीर्थ हेडगेवार चौक, स्वातंत्र्य चौक तेथून जिल्हाधिकारी कार्यालय येथे नेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेल्या सर्व हिंदू बांधवांना महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांनी संबोधित केले.आज जी परिस्थिती बांगलादेशात होत आहे तीच परिस्थिती भारतात व्हायला वेळ लागणार नाही. यासाठीच या देशातला हिंदू हा जातीपातीमध्ये वर्ग न होता एकत्रितपणे संघटित राहणं खूप गरजेचं आहे. असे ते यावेळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.