जळगाव जिल्ह्यातील १२ जागांवरील निवडणुका लांबणीवर

0

जळगाव | जळगाव जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणुका उद्यावर आल्या असताना न्यायालयीन अपिलात असलेल्या जिल्ह्यातील अमळनेर, सावदा, यावल, वरणगाव, पाचोरा आणि भुसावळ नगरपालिकांमधील नगरसेवक पदाच्या एकुण १२ जागांवरील निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. सर्व ठिकाणी आता २० डिसेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासंदर्भात आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.

त्यानुसार, जिल्हाधिकारी चार तारखेला सुधारित निवडणूक कार्यक्रम घोषित करतील. त्यानंतर अर्ज भरण्यास सुरूवात होईल आणि १० तारखेपर्यंत अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू राहील. ११ तारखेला चिन्ह वाटप आणि उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. आवश्यकता भासल्यास २० तारखेला मतदान घेण्यात येईल. दुसऱ्या दिवशी मतमोजणीची प्रक्रिया पार पडेल.

या १२ प्रभागातील निवडणूक लांबणीवर
अमळनेरमधील प्रभाग एक-अ, सावद्यातील प्रभाग दोन-ब, चार-ब आणि १०-ब, यावलमधील आठ-ब, वरणगावमधील १०-अ आणि १०-क, पाचोऱ्यातील ११-अ आणि १२-ब, भुसावळमधील पाच-ब आणि ११-ब, या १२ प्रभागातील निवडणुकांना स्थगिती देण्यात आल्याचे आदेश येऊन धडकले.

Leave A Reply

Your email address will not be published.