जळगाव जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट
जळगाव । जळगावसह जिल्ह्यातील बहुतांश भागात रात्री १ वाजेसुमारास गडगडाटी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. हवामान खात्याने आज रविवारी जळगाव जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी केला आहे. वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसाने काही ठिकाणी नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आज रविवारीसुद्धा वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
दरम्यान चक्रीय वाऱ्याची स्थिती अन् त्यामुळे दोन्ही समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यभरातील २९ जिल्ह्यांवर अवकाळी पावसाचे ढंग दाटून आले आहे. कुलाबा वेधशाळेकडून पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यासाठी वादळवाऱ्यासह विजांच्या इशारा देण्यात आला आहे.
आज रविवारी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून उकाडा जाणवत होता. मात्र काल सायंकाळी अवकाळीचे ढग दाटून आले होते. रात्री जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली.आज रविवार जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला,