महायुती उमेदवाराच्या प्रचारासाठी उद्या मुख्यमंत्री जळगावात ; असे असणार नियोजन?

0

जळगाव । जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ चा रणसंग्राम आता खऱ्या अर्थाने पेटला आहे. या निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ भाजप प्रदेशाध्यक्ष प्रवीण चव्हाण यांच्या उपस्थितीत झाला असून यांनतर आता उद्या ६ जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस जळगावात येणार आहे. यादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांचा भव्य रोड शो जळगाव शहरात आयोजित करण्यात आला आहे.

असे असणार नियोजन?

दुपारी ठीक ३ वाजता हा रोड शो छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सुरू होणार असून, नेहरू चौक, लालबहादूर शास्त्री टॉवर, चित्रा चौक, गोलाणी मार्केट या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथेच त्याचा समारोप होणार आहे. या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस नागरिकांशी थेट संवाद साधत महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन करणार आहेत.

हा रोड शो केवळ निवडणूक प्रचारापुरता मर्यादित नसून, जळगाव शहराच्या विकासाबाबतचा विश्वास आणि भविष्यातील प्रगतीचा संकल्प असल्याचे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. व्यापारी, युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांमध्ये या रोड शोबाबत मोठी उत्सुकता असून, मार्गावर ठिकठिकाणी स्वागताची तयारी सुरू आहे.

महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जळगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला भक्कम पाठिंबा द्यावा, असे आवाहन भाजप जिल्हा प्रसिद्धी प्रमुख (जळगाव जिल्हा महानगर) मनोज भांडारकर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.