जळगाव शहरातील कॉफी शॉपवर पोलिसांनी धाड टाकली

0

जळगाव । जळगाव शहरात एका महाविद्यालयापासून जवळच असलेल्या कॉफी शॉपवर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी अश्लिल चाळे करताना सहा मुला-मुलींना पोलिसांनी पकडले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी कॅफे चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एम.जे.कॉलेज परिसरातील असलेल्या चॅट अड्डा नावाच्या कॉफी शॉपमध्ये एका गाळ्यात प्लायवूडचे कंपार्टमेंट तयार केले असून त्याठिकाणी तरुण- तरुणींचे अश्लिल चाळे सुरू असतात व त्यासाठी जागा उपलब्ध करुन दिल्याची माहिती रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने या कॉफी शॉपवर छापा टाकला. या कॅफेमध्ये काही तरुण- तरुणी अश्लिल चाळे करताना आढळून आले. तसेच पोलिसांनी कॉफी शॉपमधील काही जागेची व डस्टबीनची पाहणी केली असता त्यात निरोध देखील सापडून आले आहे. कारवाईत पोलिसांनी तरुण- तरुणींना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. तसेच त्यांना तोंडी समज देऊन सोडले.

सदरची कारवाई ८ ऑक्टोम्बरला दुपारी करण्यात आली. पोलिसांनी कॅफे चालकाची देखील चौकशी केली. तर कॉफी शॉपचा परवाना देखील लावला नसल्याचे येथे दिसून आले. दरम्यान याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात कॅफे चालविणाऱ्या मयुर धोंडू राठोड (वय २५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.