चक्रीवादळाचा तडाखा : जळगाव जिल्ह्यात 1043 हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान

0

जळगाव : १ जुलै – २९ जून रोजी जिल्ह्यात आलेल्या चक्रीवादळामुळे यावल, रावेर, मुक्ताईनगर आणि चोपडा तालुक्यांतील १३१ गावांमधील १५१३ शेतकऱ्यांच्या एकूण १०४३.६२ हेक्टरवरील केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

तालुकानिहाय झालेले नुकसान असे…
यावल तालुका – ३८ गावांतील २७२ शेतकरी, २६१.७६ हेक्टरवरील पिके

रावेर तालुका – ३५ गावांतील ७१८ शेतकरी, ३८०.८६ हेक्टरवरील पिके

मुक्ताईनगर तालुका – १५ गावांतील ५०१ शेतकरी, ३८९ हेक्टरवरील पिके

चोपडा तालुका – ५ गावांतील २२ शेतकरी, १५ हेक्टरवरील पिके

या चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी होत आहे. दरम्यान, ११ जून रोजी आलेल्या वादळी वाऱ्यानेही मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी अकरा तालुक्यांमधील २५५ गावांतील ५२८४ शेतकऱ्यांच्या ४०१६.१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

हेक्टरनुसार झालेले नुकसान
एरंडोल तालुक्यात ६५ गावांतील १९६४ शेतकरी, १८७२.४० हेक्टरवरील पिके

भाजीपाला – १४ हेक्टर

ऊस – ७ हेक्टर

कडधान्य – १९८४.७५ हेक्टर

पपई – ११९.९० हेक्टर

फळपिके – १८९०.५० हेक्टर

या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले असून शासनाकडून तत्काळ मदत दिली जावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.