जळगाव जिल्ह्यात 2 व 3 डिसेंबर रोजी आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश

0

जळगाव । राज्यात नगरपरिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिताही लागू आहे. निवडणुकीचे मतदान मंगळवार, 2 डिसेंबर 2025 रोजी तर मतमोजणी बुधवार, 3 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील नगरपालिकांच्या हद्दीत मंगळवार व बुधवार या दिवशी अनेक ठिकाणी आठवडे बाजार भरतात. या बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्याने मतदान व मतमोजणीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण नये म्हणुन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांनी मुंबई मार्केट अँण्ड फेअर्स अॅक्ट 1862 च्या कलम 5 (अ) व (क) मधील अधिकारांचा वापर करून महत्त्वाचा आदेश जारी केला आहे.

त्यानुसार 02 डिसेंबर 2025 (मतदानाचा दिवस) आणि 03 डिसेंबर 2025 (मतमोजणीचा दिवस) या दोन्ही दिवशी जळगाव जिल्ह्यातील नगर पालिका हद्दींमध्ये भरणारे सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्यात येतील.तसेच नागरिकांच्या सोयीसाठी संबंधित आठवडे बाजार इतर दिवशी भरविण्याबाबत आवश्यक ती व्यवस्था करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.