जळगाव शहरात ट्रकची दुचाकीला धडक; महिलेचा जागीच मृत्यू

0

जळगाव । जळगाव शहरात पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. ज्यात दाम्पत्याच्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती जखमी झाला. ही घटना आज शुक्रवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलावर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथील रहिवासी असलेले अशोक सुकदेव गोराडे वय-६० हे पत्नी वंदना वय-५५ यांच्यासोबत शालकाच्या मुलाच्या साखरपुड्यासाठी चांदसर कामतवाडी गावी जात होते. दुचाकी क्रमांक एमएच.१९.डीजे.४७९६ ने जात असताना छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलावर सकाळी १०.१५ च्या सुमारास ट्रक क्रमांक एमएच.२१.एबी.७४६६ ने दुचाकीला धडक दिली.

अपघातात वंदना गोराडे यांचा जागीच मृत्यू झाला तर अशोक गोराडे हे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच टॉवर चौकात कर्तव्यावर असलेले वाहतूक शाखेचे कर्मचारी आणि शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. पोलिसांनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले आहे. मयत वंदना यांना एक मुलगा आणि २ मुली असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.