जैन इरिगेशनच्या विकास मल्हारांचे जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रांचे संयुक्त प्रदर्शन
मुंबई | मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे जैन इरिगेशनचे सहकारी विकास मल्हारा व चित्रकार हेमंत ढाकणे यांच्या ‘इकोज ऑफ सायलेन्स’ या अमूर्त चित्रांचे संयुक्त प्रदर्शन 17 फेब्रुवारीपासून सुरू झाले. प्रदर्शनाचे उद्घाटन जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, अमोली जैन-संघवी, अभेद्य जैन, नमन संघवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुप्रसिद्ध चित्रकार प्रकाश वाघमारे, संगीतकार मिलिंद जोशी, तसेच आर्ट गॅलरिस्ट रवींद्र मार्डिया उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये चित्रकार माधव जोशी, चित्रकार सचिन परळकर, गायिका मनिषा जोशी, समाजसेविका व अभिनेत्री इशिका शेलार, हॉटेल व्यवसायिक गोपाळ कामथ व विदुला कामथ, तसेच आर्किटेक्ट ओशिन मल्हारा यांचा समावेश होता.
आर्टीस्ट विकास मल्हारा आणि हेमंत ढाणे हे दोघेही अत्यंत संवेदनशील, विचारशील व विनम्र कलाकार म्हणून ओळखले जातात. दोघांनाही राज्य शासनाचा कला पुरस्कार लाभलेला आहे. या दोघांच्या अमूर्त चित्रांचा आत्मा म्हणजे शांतता. त्यांच्या कलाकृतींमधील शांतता ही केवळ दृश्यात्मक नसून त्यांच्या अंतरात्म्याचे प्रतिबिंब आहे. विकास मल्हारा यांच्या चित्रांमध्ये संथतेचा आग्रह प्रकर्षाने जाणवतो. राखाडी, निळे, काळे आणि मातीसदृश पांढऱ्या रंगांचे थर काळाशी संवाद साधत रूपांना उमटवतात आणि पुन्हा विरघळवतात.


हे चित्रप्रदर्शन 17 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी दरम्यान, सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत पाहणाऱ्यांसाठी खुले आहे.
प्रभाकर कोलते (विख्यात अमूर्त चित्रकार व कलाअभ्यासक) –
“/या दोन्हीनी वर्षांच्या साधनेतून आलेली रंग व अवकाशाची जाण त्यांच्या चित्रांत स्पष्टपणे दिसते. जहांगीर येथील प्रदर्शनातून याची प्रचिती येईल.”जयंत जोशी (ज्येष्ठ चित्रकार व कलाअभ्यासक) –
“हेमंत व विकास यांच्या चित्रांत हा स्वतंत्र कलादृष्टिकोन प्रभावीपणे प्रतिबिंबित होतो. दोघांच्या ही कामात दम आहे ”
प्रकाश वाघमारे (समकालीन अमूर्त चित्रकार) –
“प्रस्तूत चित्रांतून दोघेही किती सिरियस चित्रकार आहेत हे दिसून येते, रंगांची व अवकाशाची उत्तम जाण दिसून येते, जहांगीर शोसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.”