चर्चेला उधाण:- सावद्यात काही नाथा भाऊ समर्थ सध्या भाजपाच्या वाटेवर?
सावदा प्रतिनिधी
सन २०१६ मध्ये रावेर तालुक्यात असलेल्या सावदा शहरात काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन येथील नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतारण्यासाठी त्यावेळी काही लोकांची मंडळी मोठा गाजावाजा करून जन्माला आली होती.तरी यामुळे शहरातील लोकांना त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या रुपात एक परियाय सुद्धा मिळाला होता
मात्र त्यावेळी पालिका निवडणुक जवळ येताच अचानक भाजपाचे प्रभावशाली नेते तथा माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी सावदा नगरपालिका त्यांचे मुक्ताईनगर मतदारसंघात समाविष्ट असल्याने येथे भाजपाचा झेंडा फडकवण्या साठी त्यांनी सावदा येथील त्यांचे जुने जाणते निकटवर्तीय माजी नगराध्यक्ष सह निष्ठावंतांना ऐैनवेळी बाजूला सारून थेट या सर्व नविन मंडळीला रातोरात आपल्याकडे खेचून त्यांच्या हातात थेट पालिका निवडणुकीची धुरा देवून काँग्रेसचा टांगा पलटी आणि घोडे फरार करण्याची किमया करून,या सर्व नविन लोकांना भाजपाच्या तिकिटावर निवडून सुद्धा आणले.यामुळे सावदा पालिकेवर त्यावेळी भाजपाचा झेंडा फडकाविला होता.
तरी तेव्हा पासून भाजप आणि यानंतर सदरील माजी महसूलमंत्री हे खासदार शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात सध्या असे पर्यंतच्या राजकीय प्रवासात सोबत असलेली ही मंडळी पुन्हा सन २०२५ मध्ये होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाऊ ची साथ सोडून आता भाजपाच्या वाटेर असल्याची चर्चेला शहरात जोरदार उधाण आले असताना याच बरोबर ही मंडळी चालत्या गाडीत बसते असल्याचे शहरात बोलले जात आहे.
तसेच दि.२ नोव्हेंबर रोजी भाऊचा जन्म दिवसी पुर्वी प्रमाण शहरात बॅनर(होर्डिंग बोर्ड)या समर्थकांकडून न लावण्यात आल्याची गोष्ट बरेच काही सांगून जाते.तरी यावरून सदरील मंडळीची भूमिका स्पष्ट बदलाचे उघड संकेत देणारी ठरत असली, तरी राजकीय भवितव्य टिकवण्यासाठी हा पर्याय अशांसाठी उत्तम व सोपा असतो. मात्र अनेक वर्षांपासून एकनिष्ठेने पक्षाचे काम करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच पक्षाचे वरिष्ठ अशा नविन मंडळीला पक्षात घेतात असे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.