कै. प्रमिला रामचंद्र धुमाळ यांच्या स्मरणार्थ अनाथाश्रमास मारुती व्हॅन व किराणा वाटप
प्रतिनिधी पुणे स्नेहा उत्तम मडावी
काल कोथरुड पुणे येथे कार्यक्रम पार पडला दानसुर शिवभक्त श्री महंत डॉ श्रीकांतदास धुमाळ महाराज यांनी गुरू पौर्णिमेचा योग साधून शिवशंभो चॅरिटेबल ट्रस्ट यांचे वतीने मातोश्री सुकन्या बसलिंगय्या हिरेमठ या वृध्दश्रमास व अनाथाश्रमास आपल्या दिवंगत मातोश्री वै.सौ.प्रमिला रामचंद्र धुमाळ यांच्या वर्षश्राद्ध निमित्ताने मारुती व्हॅन व नायगावं व म्हातोबाची आळंदी पाटस कुरकुंब यवत येथील दत्तक घेतलेल्या पारधी समाजाच्या पाड्यावर व अनाथ मुलांसाठी एक महिण्याचा किराणा वाटप केला सदर पारधी समाजाच्या ४२ कुंटुबाना दत्तक घेतले कार्यक्रमास परिसरातील बांधव व ट्रस्टचे पद अधिकारी पञकार सुनिल ज्ञानदेव भोसले अतुल बोराडे समीर शेठ राउत पाटील स्वयम धुमाळ शिखर शिंगनापुरचे सरपंच सारिका शिवराज शेंडे सुनिल कांबळे निशिकांत धुमाळ महादेव बिराजदार उपस्थित होते