इगतपुरी तालुक्याने हिरवळीचा शालू पांघरल्याने पर्यटकांची रीघ

0

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या इगतपुरी तालुक्याने हिरवळीचा शालू पांघरल्याने पर्यटकांची जणू काही रीघ लागत आहे. इगतपुरी तालुका हा डोंगराळ व दुर्गम भाग असल्याने या तालुक्याने निसर्गाची मोठी देणगी लाभली आहे.भंडारदरा धरण,कळसुबाई शिखर,दारणा धरण,भावली धनुष्य तीर्थ,वैतरणा परिसर,श्री क्षेत्र कावनई,अलंग,कुरुंग वाडी या ठिकाणी पावसाळ्यात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यात शनिवार व रविवार सुट्टी घालवण्यासाठी मुंबई,ठाणे,नाशिक येथील पर्यटकांची रेघ सुरु आहे.

इगतपुरी तालुक्याला निसर्गाची अमाप वरदान लाभले आहे.या तालुक्यातील ऐतिहासिक,धार्मिक तसेच निसर्गाचे विशेष महत्व लाभले आहे.गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या पावसाने पश्चिम भागातील नद्या खळखळून वाहू लागल्या आहे. धरणांमध्ये काहीसा पाणी साठा वाडत आहे.पावसामुळे निसर्गही खुलुन गेला आहे.घाटमाथ्यावर,डोंगरदऱ्यामध्ये हिरवाईने नटलेला निसर्ग दिसतो निसर्गाने जणू हिरवाइचा शालू पेहराव केल्यागत निसर्ग पाहावा तर इगतपुरी तालुक्यात असे अवर्णीय चित्र पहावयास मिळते.

कसारा घाटातील विहंगमय दृश्य,भावली धरण परिसरात खळखळनारे धबधबे,वैतरणा मार्गावरील हिरवाईने नटलेला चौफेर प्रदेश,नागमोडी वळणाची वाट,कसाऱ्याचा घाट,घाटनदेवीचा विहंगमय वातावरण,डोंगरावर बरसणारा पर्जन्य तसेच धार्मिक विशेष महत्व व सिहांस्थाचे मूलस्थान असलेले श्रीक्षेत्र कावनई येथेहि पर्यटकांची ओघ वाढत असतो आहे. इगतपुरी तालुक्यातील निसर्गाचा आनंद लुटून हे पर्यटक नजीकच्या भंडारदरा,त्रंबकेश्वर येथे रवाना होता त्रंबकेश्वर येथे जाणारा मार्ग हा देखील निसर्गाने नटलेला हिरवाईचा आहे. पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या नेहमीच्या ठिकाणांबरोबरच नाशिकच्या अलीकडे असलेल्या इगतपुरीत भुरभुर पडणारा पाऊस मंद वारा.. दाट धुकं.. भिजल्यानंतर अंगात भरलेली थोडीशी हुडहुडी गालावर फिरवताना मिळालेली ऊब… पावसाळ्यात कुठेही फिरायला गेल्यावर असं वातावरण असणं अपेक्षित असतं इगतपुरी हे निसर्गानं मुक्त उधळण केलेलं ठिकाणही सर्वोत्तम पर्याय आहे. विपश्यना केंद्रामुळे देशापरदेशात प्रसिद्ध असलेल्या इगतपुरीमध्ये हिरवी दुलई पांघरलेला निसर्ग, मोठ्या गाजेने आपल्या अस्तित्वाची दखल घ्यायला लावणारे पावसाळी धबधबे, तुडुंब भरलेली धरणं, शेतीच्या कामांसाठी बैलाच्या संगतीने फिरणारे शेतकरी हा सगळा निसर्गरम्य नजारा सहजच अनुभवता येतो. शहरांमध्ये माणसांच्या कुतूहलातून बाहेर पडण्यासाठी, मनातील विचारांचा निचरा करण्यासाठी निसर्गाशिवाय दुसरा हक्काचा सवंगडीच नाही.इगतपुरी हा निसर्गसंपन्न तालुका आहे. इगतपुरी तालुक्याला् डोंगररांगांचा वेढा आहे. त्यात अंजनेरी, अलंग,मलंग धोडप,कुरुगवाडीांचाही समावेश आहे. इगतपुरी परिसरात खूप धबधबे आहेत. त्यात सुमारे १७ किलोमीटर अंतरावर ठाणे जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील विहीगावात असलेला अशोका वॉटरफॉल, भावली धरणाजवळचे आणि कसारा घाटातले धबधबे, फटकदार अशी नावं प्रामुख्यानं घेता येतील. ‘अशोका’ चित्रपटाचं शूटिंग येथे झाल्यामुळे हा धबधबा अशोका नावानं ओळखला जात असल्याची माहिती मिळत आहे.निसर्गात मनसोक्त भटकून झाल्यावर अत्यंत अप्रतिम पद्धतीनं उभारलेलं हे ठिकाण पाहून झाल्यावर प्रदूषणाचा लवलेशही नसलेला निसर्ग आणि पक्ष्यांचं श्रवणीय कूजन मनात साठवून ठेवण्याचा आनंद पर्यटक सध्या घेत आहे.

जिल्ह्याचे काश्मीर समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात निसर्गाने भरभरून वरदान दिले आहे सर्वाधिक 3500 मिमी पाऊसाची या तालुक्यात नोंद होते मुंबई सह मराठवाड्याला पाणी पाजनारा तालुका व जिल्ह्यातील सर्वाधिक धरणे म्हणून ओळख इगतपुरी तालुक्याची ओळख आहे अगदी नाशिक व भारताची राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबई चे हे प्रवेशद्वार आहे. सर्वाधिक गड किल्ले या ठिकाणी आहेत राज्यातील सर्वात उंच शिखर इगतपुरी तालुक्यात आहे.मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग एनएच ३ वरचं इगतपुरी हे हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून १९०० फुटांवर वसलं असल्याने वर्षाचे ३६५ दिवस इथलं वातावरण आल्हाददायक असतं. पावसाळा आणि थंडीमधलं इथलं वातावरण सर्वात चांगलं असलं तरी इथला उन्हाळाही मुंबईसारख्या शहरांपेक्षा चांगलाच सुसह्य असतो. म्हणूनच गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी व वन डे रिटन ट्रिप पर्याय म्हणून इगतपुरीचा आनंद घेऊ शकतो.

पश्चिम घाटामध्ये वसलेलं हे लहानसं शहर आता चांगलंच नावारूपाला आलं आहे. इगतपुरीचं पावसाळ्यातलं रूप इतर ऋतूंच्या तुलनेत जास्त भुरळ घालतं. ते रूप आपल्या मनोवृत्तीतही स्वागतार्ह बदल घडवून आणतं. सर्व शहरी गोंधळांपासून मुक्त असलेल्या निसर्गरम्य इगतपुरीमध्ये आपलं एखादं घर किंवा बंगला असेल तर? नुसती कल्पनाच इतकी मोहक वाटते, तर प्रत्यक्षात अशा घरात राहण्याचं सुख काय असेल! इगतपुरीला सह्याद्रीतल्या उंच शिखरांचा शेजार लाभला आहे. महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर अशी ओळख असणारं ‘कळसुबाई’ इगतपुरीपासून केवळ ३५ किमी अंतरावर आहे. तसंच त्रिंगळवाडीचा किल्लाही इगतपुरीतच आहे. सातवाहनांच्या काळातल्या अनेक किल्ल्यांचे अवशेष इगतपुरीच्या दऱ्याखोऱ्यांमधून फिरताना सापडतात. त्यामुळे इथे वर्षभर ट्रेकर्स आणि हायकर्सची वर्दळ असते.

इगतपुरी हे नाव केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगात माहीत असण्याचं आणखी एक कारण म्हणजे धम्मगिरी विपश्यना केंद्र. २५०० वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी ‘स्व’त्वाची ओळख होण्यासाठी विपश्यनेचा मार्ग दाखवला होता. त्या मार्गावर चालण्यासाठी लोकांना प्रेरित करण्यासाठी या केंद्राची स्थापना करण्यात आली. भव्य डोंगरांच्या पार्श्वभूमीवर हे विपश्यना केंद्र अधिकच अद्भूत वाटतं. मौनाची वाट चोखळत आपल्या अंतर्मनाशी संवाद साधण्याच्या या मार्गाने अनेकांच्या मनोवृत्तीत आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. म्हणूनच केवळ आपल्या राज्यातून, देशातून नव्हे तर सबंध जगातून लोक इथे विपश्यनेचा अनुभव घेण्यासाठी येतात.

मध्य रेल्वेवर लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांना इगतपुरी हे जंक्शन चांगलंच ओळखीचं आहे. सर्वच लांब पल्ल्याच्या गाड्या इगतपुरीला थांबतात. कारण याच स्टेशनवर इंजीन, गार्ड आणि ड्रायव्हर बदलले जातात. त्यामुळे इथे गाडी चांगली वीस ते पंचवीस मिनिटं थांबते. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर उतरून पाय मोकळे करताना आसपासच्या निसर्गाचा आणि त्यासोबत गरमागरम वडे पाव, कांदाभजीचा आनंद लुटता येतो. त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्येही इगतपुरी चांगलंच प्रसिद्ध आहे.

इगतपुरी हे पावसाळी पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहेच, शिवाय त्याच्या आसपासही पाहण्यासारखी बरीच स्थळं आहेत. इगतपुरीमध्ये असताना भातसा रिव्हर व्हॅली, कॅमल व्हॅली, वालावलकर शिवाजी म्युझियम, घाटणदेवी मंदिर, पाच धबधबे यांना भेट द्यायलाच हवी. शिवाय जवळच असणारी भंडारदरा, वैतरणा तलाव ही स्थळंही पाहता येतील. ११ व्या शतकातलं हेमाडपंथी बांधणीचं अमृतेश्वराचं मंदिरही इगतपुरीपासून जवळ आहे. घोटीवरून शिर्डीला जाणारा थेट रस्ता असल्याने अनेक जण इगतपुरीला थांबून मग शिर्डीचा रस्ता पकडतात. इगतपुरीमध्ये महापालिकेचा तलाव, रेल्वेचा तलाव, तळेगाव तलाव असे काही तलावही आहेत. पर्यटकांचा जवळजवळ वर्षभर राबता असलेले जिल्ह्याच्ये काश्मीर म्हणून इगतपुरी ची एक ओळख आहे.

निसर्ग हा मोठा विलक्षण जादूगर आहे वर्षभर नित्यनेमाने निरनिराळ्या ऋतुत आपली जादू दाखवत माणसाच्या मनावर गारुड करत असतो.पावसाचं आगमन म्हणजे हिरवाईले बहारणाऱ्या ऋतूची चाहूल लागते.पावसाळी हंगाम सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी झाला असुन, पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील डोंगर-दऱ्या हिरवाईने नटले आहेत.निसर्गरम्य हिरवाईने प्रत्येकाला मंत्रमुग्ध करणाऱ्या धबधब्याने इगतपुरीत मोठ्या प्रमाणात पर्यटकांची चहलपहल सुरु झाली आहे उन्हाळ्यातली झाडांची सळसळ कमी होऊन आता डोंगरदऱ्यातली पाण्याची खळखळ सुरु झाली आहे.कसारा घाटातून जाताना व येताना ओबडधोबड दगडांचे उतार, कोरड्या पडलेल्या या दगडांना असलेली पाण्याची ओढ आणि यातुन पावसाच्या सरी बरसुन गेल्यावर तयार झालेले छोटेछोटे धबधबे हे उन्हाळ्याने शिणलेल्या मनाची आणि डोळ्यांचीही तहान भागवतात.शहरापरिसरातच अनेक डोंगरदऱ्या असल्याने या परिसरात जणू हिरवाईने शालू चढविला तर नाही ना? असा भास प्रत्येकालाच होतो.डोंगरमाथ्यांवरुन ढगांचे दाट अच्चादन व धुक्याने मंत्रमुग्ध करणारी थंड हवा, अधूनमधून डोकावणारी जमिनीवरची आणि झाडांवरचीही हिरवी-पोपटी पालवी नवचैतन्याची चाहूलच देत आहे.

निसर्गानं भुसृष्टीवर वसांतात चढलेला हिरवा साज अधिकच खुलवून ताजा, टवटवीत आणि जिवंत करण्याचं काम जुलै महिण्यात मोठ्या प्रमाणात पावसाच्या सरी करतात.या सरींचा मायेचा हात वृक्षराजीवरुन फिरताच निसर्गात नवचैतन्य आलेलं जाणवतं.कसारा घाटातून खाली दरीत बघितलं, तर कधी उतारावर, तर कधी डोंगराखालच्या सखल भागात हिरवीगार भात शेतं चौकडीची नक्षी दाखवतात.

इगतपुरी शहरपरिसरात व मुंबई-आग्रा महामार्गालगत हिरवीगार भात शेती हे सगळं बघितलं की मन टवटवीत झाल्याशिवाय राहत नाही.म्हणून तर हल्ली विशेषतः मुंबई, ठाणे, नाशिकसारख्या सिमेंट-काँक्रीटच्या जंगलांनी वेढलेल्या शहरांमधली माणसं ही घर आणि ऑफिसच्या चक्रातून थोडीशी सुटका करून घेऊन दर शनिवार व रविवारी मोठया प्रमाणात येथे पावसाचा, धबधबे बघण्याचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. पुन्हा एकदा शरीर आणि मन टवटवीत झालं की नव्या जोमाने कामाला लागतात. अशा या हिरवाईने नटलेल्या निसर्गाकडे पाहताना मन ताजं आणि प्रफूल्लीत तर होतंच, पण त्याला एक प्रकारची उभारीही मिळते. रिमझिम पावसाच्या सरी त्यामुळ सप्तरंगांचा रंगचक्रावर मध्यभागी येणारा हिरवा रंग हा भडक रंग आणि थंड रंगांमध्ये संतुलन साधण्याचं काम करतो.त्यामुळेच डोळ्यांना आणि मनाला तो शांत करतो.असे चित्र सध्या इगतपुरी परिसरात दिसते.इगतपुरीच्या निसर्गसौंदर्याची भुरळ चित्रपटसृष्टीला पडली नसती तर नवलच. अनेक चित्रपट तसंच शॉर्टफिल्म्सच तसेच काही मोठ्या चित्रपटांचे शूटिंग देखील इगतपुरी तालुक्यात झाले आहे. इगतपुरीचा प्रवास मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेन कसाऱ्यापर्यंतच आहेत. त्यामुळे रेल्वे मार्गाने इगतपुरीला जायचं झाल्यास लांब पल्ल्याच्या गाड्या पकडाव्या लागतात. नाशिक-मनमाडच्या बसेसही इगतपुरीला थांबतात. मुंबई-नाशिकदरम्यान बऱ्याच खासगी बसेस तसंच एसटी धावत असल्याने इगतपुरीला जाण्यासाठी तोही मार्ग आहे.

निसर्गरम्य भावली धरण तर भावलीचे मनमोहक धबधबे अस काही विलक्षन वातावरण या ठिकाणी आहे तर इकडे पूर्व भागात ब्रिटिशकालीन दारणा धरणावर पर्यटकांची रीघ आहे तर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणाचा परिसर निसर्गाने नटून निघाला आहे. तर अजून बघितले म्हणजे कसारा घाटातून खोल अशा ठिकाणी बोगद्यातून सूर सूर अशी निघालेले रेल्वे दिसते असे इगतपुरीचे वातावरण आहे. वाहनांची वरदळ शनिवार व रविवार हे मुंबईकर पर्यटकांच्या दृष्टीने महत्वाचे दिवस असल्याने सुट्टीचा आनंद उपभोगण्यासाठी पर्यटक आपल्या कुटुंबांसह पर्यटनाला येत असल्याने इगतपुरी घोटीत या मुंबईच्या वाहनांची वर्दळ नेहमीच पहावयास मिळते.भंडारदरा श्रीक्षेत्र कावनई व शिर्डी येथे जाणारे भाविक पर्यटक घोटी शहरातून जात असल्याने त्यांच्या वाहनांची गर्दी घोटी इगतपुरीत पहावयास मिळते.तसेच घरी रवाना होण्या पूर्वी ताजा भाजीपाला घेण्यासाठी या पर्यटकांचा घोटीत वावर बगण्यास मिळतो.

समृद्धीमुळे इगतपुरीच्या पर्यटनास अजून चालना मिळत असून इगतपुरी तालुक्यातील गेलेले या समृद्धी हायवेच्या बोगद्यांना बघण्यासाठी देखील पर्यटक इगतपुरीतून प्रवास करत आहे देशातील सर्वात तीन मोठा बोगदा हा इगतपुरी इथून गेल्यामुळे पर्यटकांना देशी भुरळ ही नेहमीच पडत असते दरम्यान मुंबई आणि नाशिकचा अंतर कापण्यासाठी अवघे तीन तासाचा प्रवास असतो त्यामुळे समृद्धीच्या हवेमुळे देखील इगतपुरीच्या पर्यटनाला मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.