इगतपुरी विधानसभा स्वराज्य पक्षाचे उमेदवार झाले भाजपवासी : तालुक्यात स्वराज्य पक्षाला भगदाड

0

इगतपुरी :
इगतपुरी तालुक्यात स्वराज्य पक्षाला भगदाड पडले असुन विधानसभा निवडणुक लढलेले उमेदवार डॉ. शरद तळपाडे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते दादर येथील पक्ष कार्यालयात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रदेश महामंत्री विजय चौधरी, संघटनमंत्री रविंद्र अनासपुरे, जिल्हाध्यक्ष सुनिल बच्छाव, भाजपा नेते भास्करराव गुंजाळ, उत्तमराव भोसले आदी उपस्थित होते. इगतपुरी तालुक्यात भारतीय जनता पक्ष मजबूत होत असताना हा पक्षप्रवेश म्हणजे येणाऱ्या काळात पक्ष ताकदीने सर्व निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचे दिसते. डॉ. तळपाडे यांच्यासह गोंदे सोसायटी माजी चेअरमन विजय नाठे, कुर्हेगावचे रामदास धोंगडे, गोंदेदुमालाचे कैलास नाठे, स्वराज्य पक्ष सहकार जिल्हाप्रमुख हरीश कुंदे, बेलगाव कुऱ्हेचे माजी सरपंच राजाराम गुळवे, शिवसेना शाखा प्रमुख दत्तूभाऊ नाठे, धनंजय नाठे, श्रीराम करंडे, भावराव धादवड, स्वराज्य पक्ष शाखा प्रमुख गजिराम वारघडे, शेनवड खुर्द स्वराज्य पक्ष उप शाखा प्रमुख दतु वारघडे, स्वराज्य पक्ष गट प्रमुख बापू गुळवे, राजाराम मुसळे, प्रकाश मुथा, कृष्णा गभाले, गौरव गभाले आदी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. या पक्ष प्रवेशास महिला जिल्हाध्यक्षा सीमा झोले, इगतपुरी पूर्व अध्यक्ष भाऊसाहेब धोंगडे, जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भोर, आय टी सेलचे अमोल पवार, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सजन नाठे, जिल्हा पदाधिकारी अनिल चौधरी, चेअरमन योगेश सुरुडे, ओ बी सी मोर्चा केतन विसपुते आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मोदीजींच्या व देवेंद्रजीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक जन पक्षप्रवेश करत आहेत. पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवण्यासाठी कार्यकर्ता हा केंद्रबिंदू असणार आहे. इगतपुरी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या काळात प्रत्येक निवडणुकीला पक्ष ताकदीने सामोरे जाणार आहोत.
— भास्करराव गुंजाळ, भाजपा नेते

Leave A Reply

Your email address will not be published.