१०१ किलो गांजासह एक कार असा ३१ लाख ६१ हजाराचा मुद्देमाल जप्त ; इगतपुरी पोलीसांची मोठी कारवाई

0

इगतपुरी ।
समृद्धी महामार्गालगत नांदगावसदो शिवारातील चौफुलीवर इगतपुरी पोलीसांनी वाहन तपासणीत १०१ कीलो गांजा जप्त करून मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई इगतपुरी पोलीस व जिल्हा वाहन शाखेच्या पोलिसांनी केली असुन या कारवाईत १०१ किलो गांजासह एक कार असा ३१ लाख ६१ हजाराचा मुद्देमाल जप्त करत मोठी कारवाई केली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीची अचारसंहिता लागु करण्यात आली असल्याने त्या पार्श्वभुमीवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधिक्षक आदीत्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन आठवड्यापासुन अवैध व्यवसायांविरोधात व्यापक स्वरूपात कारवाई करण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने मंगळवार दि. २९ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल तसरे व जिल्हा वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक नांदगांव सदो शिवारातुन जाणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग टोलनाक्याच्या एक्झीट पुलाखाली संयुक्तपणे वाहन तपासणी करत असतांना टोलनाका बाजुकडुन एक सफेद रंगाची मारुती कंपनीची इरटीका कार क्र. एम. एच. ४८ डी. सी. ०९८७ हि येतांना दिसुन आली. सदर कार चालकाला थांबविण्याचा इशारा करून कारमध्ये काय आहे विचारले असता ते आम्ही कापडाचे व्यापारी आहे असे उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागली.

कारच्या डिकीतील तीन काळ्या कपड्यांच्या पिशव्यांची तपासणी केली असता त्यात १०१ किलो ७१० ग्रॅम वजन असलेले सुका गांजाचे ४९ पाकीटे आढळून आली. गांजा सापडताच १) जयप्रकश लालबहादुर तिवारी, वय ४० वर्ष, मुळ रा. नकहरा शिंगरमौ तहसिल बदलापुर, जिल्हा जोहनपुर, उत्तर प्रदेश, मुळ रा. गोकुळवाडी, विरार आरटीओ, विरार पर्वु, जि. पालघर, २) प्रदिप भोलानाथ दुबे, वय-४७ वर्ष, मुळ रा. बनारस राज्य उत्तर प्रदेश हल्ली रा. के. पी. शर्मा चाळ, पाईपलाईन रोड खार पुर्व, मुंबई पुर्व या दोन आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत २० लाख ३४ हजार रुपये किंमतीचा गांजा, ११ लाखाची सफेद कार, १० हजार व १७ हजार रुपये किंमतीचे २ मोबाईल असा ३१ लाख ६१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल तसरे, उपनिरिक्षक संदिप शिंदे, सहायक पोलीस उपनिरिक्षक, परदेशी, तातडे, पोलीस हवालदार सागर सौदागर, काळे, घेगडमल, गोपनिय विभागाचे निलेश देवराज, निकुंभ, पोलीस शिपाई पोटींदे, विजय रुद्रे यांच्यासह जिल्हा वाहतुक शाखेचे सहायक पोलीस उपनिरिक्षक रामचंद्र भवर, पोलीस नाईक राजेंद्र वायकंडे, विनोद दुसाणे, विनोद शिंपी या पोलीस पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असुन आरोपींविरोधात इगतपुरी पोलीस ठाण्यात अंमली औषध द्रव्य मनप्रभावी पदार्थ अधिनीयम १९८५ चे कलम ८ (क), २०(ब) व २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.