महिला बचत गटांना आर-सेटी प्रशिक्षण संस्थेच्या वतीने उद्योजकता विकास प्रशिक्षण
इगतपुरी: बँक ऑफ महाराष्ट्र, महाबँक आर-सेटी प्रशिक्षण संस्था, उमेद अभियान इगतपुरी, ऋचा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने इगतपुरी तालुक्यातील अडसरे बु. येथे महीला बचत गटांना आर-सेटी प्रशिक्षण संस्थेतर्फे ६ दिवसाचे ऊद्मोजकत्ता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रशिक्षणामध्ये ऊद्मोजकीय क्षमता, मार्केटिंग व विक्री व्यवस्थापन, शासनाच्या विविध कर्ज योजना, बाजारपेठ सर्वेक्षण आणि व्यवस्थापन इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये २५ महिलांना प्रवेश निश्चित केले होते. सदर या प्रशिक्षण कार्यक्रमाचा निरोप समारंभ दि. २३ आँक्टोबर रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून अनूराधा लोंढे, सागर ढगे, समीर कुलकर्णी,भूषण सरोदे आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन शिल्पा साबळे यांनी केले तर ज्योती कुंदे व सिमा साबळे ह्यांनी मनोगत व्यक्त केले. सदर प्रशिक्षण कार्यक्रम आर-सेटीचे संचालक गणेश सरोदे, ऋचा फांउडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल पंत, हरिश वैद्य, डाँ. प्रनोती सावकार, आरसेटीचे राजेंद्र पवार, उमेदचे उज्ज्वल सोनवणे, दिपाली वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.