HMPV चा महाराष्ट्रात शिरकाव,नागपुरात आढळले रुग्ण; राज्य सरकार अलर्ट मोडवर

0

नागपूर । चीनमध्ये हाहाकार माजवलेल्या एचएमपीव्ही व्हायरसच्या बातमीने लोकांच्या कोरोना महामारीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. अशातच आता HMPV व्हायरसने भारतातील काही राज्यांमध्ये शिरकाव केल्याच्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भारतात आतापर्यंत ८ ते १० रूग्ण आढळले आहेत. आता या HMPV व्हायरसचे महाराष्ट्रातील नागपूरमध्ये दोन संशयीत रूग्ण आढळले आहे. राज्य सरकार अलर्ट मोडवर आहे.

नागपुरातही एचएमपीव्ही चे 2 रुग्ण संशयित आढळले आहेत. दोन लहान मुलांचा रिपोर्ट एचएमपीव्ही पॉझिटिव्ह आल्याच खासगी रुग्णलायांतून सांगितलं जातं आहे. यामध्ये सात वर्षीय मुलगा आणि 14 वर्षीय मुलीचा रिपोर्ट 3 जानेवारीला खासगी रुग्णालयात पॉझिटिव्ह आल्याचे समोर आलेय. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मुलं सध्या ठणठणीत बरी झालेली आहेत. पण जीनोम सिक्वेन्सींग केली जाईल, असे समोर आलेयया दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता. दोन्ही मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज पडली नाही. दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाल्याचीही माहिती. .

दरम्यान, चीनमधील HMPV विषाणूसंदर्भात नाहक भीती न बाळगता आवश्यक ती सर्व काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. याबाबत काही नियमावली देखील बनवण्यात आली आहे. नागरिकांनी त्याचे पालन करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. या नियमावलीबाबत अधिक जाणून घेऊयात. ()

Leave A Reply

Your email address will not be published.