हतनूर धरणाचे १८ दरवाजे उघडले; ३३१५४ क्युसेस पाण्याचा विसर्ग

0

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरणामध्ये पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून, आज धरणाचे १८ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. यापूर्वी काल रविवारी धरणाचे यंदाच्या मान्सून हंगामात प्रथमच २२ दरवाजे उघडण्यात आले होते. सध्या तापीला पूर आला असून यामुळे जिल्हा प्रशासनाने परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हातनूर धरण हे तापी व पूर्णा नदीवर वसलेले असून, जळगाव जिल्ह्यातील सिंचन, वीज निर्मिती आणि पाणीपुरवठा या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मागच्या दोन दिवसात धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणातील जलसाठा झपाट्याने वाढत आहे.

रविवारी यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच धरणाचे २२ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले होते मात्र आज यातील चार बंद करून हतनूर धरणाचे १८ दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले. उघण्यात आलेल्या दरवाज्या वाटून ३३१५४ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे सध्या तापी नदीला पूर आला असून यामुळे जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.