हतनूर धरणातून 56 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग; नदीपात्रा जवळच्या गावांना सुरक्षिततेसाठी आवाहन
जळगाव | हतनूर धरणाच्या (पूर्णा व तापी नदीच्या) पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस व वाढलेला येवा तसेच धरण पातळीत झालेली वाढ लक्षात घेऊन आज दि. 18 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता धरणातून 1598.00 क्युमेक्स (56433.37 क्युसेक्स) इतका प्रवाह नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
यासाठी धरणाची 04 गेट पूर्णपणे व 16 गेट प्रत्येकी 1.00 मीटर इतकी उघडण्यात आली आहेत.


तापी व पूर्णा नदीकाठी राहणाऱ्या गावातील नागरिकांनी नदीकाठावर न जाणे, पोहणे, मासेमारी करणे तसेच गुरे-ढोरे बांधणे टाळावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांनी दक्षता बाळगावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.