आयुष्यात शिवसेना तुला माहिती आहे का, चोट्या तुझ्यावर… संजय राऊतांवर गुलाबराव पाटीलांचा जोरदार हल्लाबोल
जळगाव । शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. पक्ष चोरीचा, दरोडा घातल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. यावर बोलताना गुलाबराव पाटीलांनी हल्लाबोल केला. आयुष्यात शिवसेना तुला माहिती आहे का चोट्या तुझ्यावर एक तरी केस आहे का?, असा खोचक सवाल शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना विचारला आहे. तर बाळासाहेब म्हणायचे ज्यांच्यावर केस नाहीत तो शिवसैनिक नाही, असा टोला ही त्यांनी राऊत यांना लगावला आहे.
दरम्यान गुलाबराव पाटील पुढे बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरे आता पंजाला मत देणार आहेत, ज्या काँग्रेस सरकारने आमच्यावर, शिवसैनिकांवर केसेस टाकल्या. त्यांना ते मतदान करणार आहेत. बाळासाहेबांचा आत्मा काय म्हणत असेल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
इंडियाकडे उमेदवार नाही
गुलाबराव पाटील म्हणाले की, आमचा मुख्यमंत्री साधा आहे, रिक्षावाला आहे. गरीबांचा मुख्यमंत्री झालेला यांना पटत नाही. बाळासाहेब मुख्यमंत्री होऊ शकले असते, पण त्यांनी ते काम केले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. तर ग्रामपंचायतीत सुध्दा सरपंचचा उमेदवार लागतो,आमच्याकडे टॉप टू बॉटम एकच उमेदवार आहे. आमच्याकडे नरेंद्र दामोदरदास मोदी आहेत, असे म्हणत इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदासाठी कुणी उमेदवार नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे.