गुजरातमध्ये आनंद आणि बडोदाला जोडणाऱ्या पुलाचे दोन तुकडे

0

बडोदा । गुजरातमधून एक भीषण घटना समोर आलीय. ज्यात आनंद आणि बडोदा या दोन जिल्ह्यांना जोडणारा गंभीरा पूल आज (बुधवार) सकाळी अचानक कोसळला. पुलाची दोन तुकडे झाले. पूल कोसळल्याने त्यावरुन जाणारी अनेक वाहने थेट नदीत कोसळली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. घटनास्थळावरील परिस्थिती पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (बुधवार) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. आनंद आणि बडोदा मार्गावरील महिसागर नदीवर असलेला हा गंभीरा पूल कोसळला. पुलावरून वाहनांची ये-जा सुरू असतानाच पुलाचे दोन तुकडे झाली. परिणामी, अनेक वाहने नदीत कोसळली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन ट्रक आणि दोन व्हॅनसह एकूण चार वाहने नदीत कोसळली आहे. आतापर्यंत तीन मृतदेह हाती लागले आहेत.


पूल कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, बचाव पथक आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आतापर्यंत चार जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. नदीत पडलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आणि वाहने बाहेर काढण्यासाठी सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असल्याची माहिती पडारा पोलिस निरीक्षक विजय चरण यांनी दिली आहे.

या दुर्घटनेमुळे मोठ्या जीवितहानीची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली असून, मदतकार्याला गती देण्यासाठी वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अद्याप नदीत नेमकी किती वाहने पडली आहेत आणि किती लोक बेपत्ता आहेत, याबाबत अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.