एपीएमसी वाहतूक शाखेच्या अंतर्गत स्कूल बस चालकांना मार्गदर्शन ! एपीएमसी वाहतूक शाखेचा अभिनव उपक्रम

0

नवी मुंबई प्रतिनिधी | 
शालेय विध्यार्थी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवी मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शन खाली एपीएमसी वाहतूक शाखेच्या वतीने स्कूल बस चालकांना प्रबोधनात्मक जनजागृती संदर्भात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
शाळकरी मुलं शाळेमध्ये ने आण करण्यासाठी पालक वर्गांचा कल नियमित शाळेतील किंवा खाजगी स्कूल बस वर असतो त्याप्रमाणे ते आपले पाल्याला शाळेच्या वेळेनुसार स्कूल बसची वाट बघत स्कूलमध्ये सुखरूप पोहोचवण्यासाठी स्कूल बसचा मार्ग अवलंबत असतात

मात्र हे स्कूल बस चालक आपल्या पाल्याला सुरक्षित रित्या पोहोचवतात की नाही याची कोणतीही चिंता पालक वर्ग मध्ये नसते मुलांना स्कूलच्या बस मध्ये बसवले की पालकाची जबाबदारी संपली असे बहुतेक पालक वर्गामध्ये समाज असतो. आपल्या पाल्याला शाळेत पोचण्याचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून पालक वर्ग पहिली पसंती शाळेच्या स्कूल बसला देत असतात.याच दरम्यान एपीएमसी वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी आपल्या वाहतूक शाखा अंतर्गत येणाऱ्या स्कूल बस चालकांची शाळा घेऊन त्यांना वाहतुकीचे नियम समजावून सांगितले आहेत पालक हे आपल्या पाल्याला आपल्या विश्वासावरती बिनधास्तपणे शाळेत जाण्यासाठी पाठवत असतात त्यामुळे त्या पाल्याला व्यवस्थितरित्या शाळेत पोहोचता आले पाहिजे यासाठी स्कूल बस चालकाची जबाबदारी फार मोठ्या प्रमाणात आहे म्हणून स्कूल बस चालकाने वाहतुकीचे सर्वच नेम व्यवस्थित रित्या पाळून भविष्यात कोणत्याच प्रकारची दुर्दैवी घटना घडू नये म्हणून स्कूल बस वाहन चालकांचे प्रबोधन करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले होते.

दरम्यान : वाहतूक शाखाचे उपायुक्त तिरुपती काकडे यांनी वाहतुकीबद्दल चांगल्या प्रकारचे धोरण नवी मुंबई परिसरात आखल्याने अशा प्रकारचे प्रबोधन सर्वच वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात येत आहे. त्यामुळे वाहन चालक व नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होताना दिसत आहे. एपीएमसी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व स्कूल व चालकांनी या प्रबोधनात्मक कार्यक्रमाला हजेरी लावून उत्तम प्रतिसाद दिल्याचे चित्र दिसत होते

पीएमसी वाहतूक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एखाद्या खाजगी वाहन चालकांनी जर शाळेकरी मुलांची शाळेमध्ये नेण्यासाठी आपली खाजगी वाहने लावून मुलांच्या जीवनाशी खेळत असतील असे आमच्या निदर्शनास आले तर त्या वाहनावर व चालकावर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल. व अशी काही वाहने नागरिकांच्या निदर्शनास आली तर त्यांनी तात्काळ एपीएमसी वाहतूक पोलीस शाखेकडे संपर्क साधावा

विमल बिडवे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
वाहतूक शाखा एपीएमसी पोलीस ठाणे, नवी मुंबई

Leave A Reply

Your email address will not be published.