ठाणे येथे सेगीज चापवाला उपक्रमाचा भव्य शुभारंभ

0

ठाणे : शहरातील सेगीज चापवाला या उपक्रमाचा शुभारंभ प्रसंगी “शिक्षणमहर्षी” श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या शुभहस्ते हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमास विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या प्रसंगी श्री. संदीप लेले (जिल्हाध्यक्ष, ठाणे शहर भाजप), श्री. नारायण पवार (गटनेते व नगरसेवक, ठाणे महानगरपालिका, भाजप), श्रीमती काजोल गुणीजन (नगरसेविका, ठाणे महानगरपालिका, भाजप), सौ. माधुरी मेटांगे (नगरसेविका, ठाणे महानगरपालिका, भाजप), समाजसेवक श्री. सुभाष रेनोसे, श्री. संकेत शिंदे व त्यांचा परिवार उपस्थित होते.

या प्रसंगी श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांनी सांगितले की, “आज ‘चापवाला’ या नव्या उपक्रमाच्या शुभारंभ होत आहे.कोणताही व्यवसाय सुरू करताना फक्त नफा हा उद्देश नसावा, तर गुणवत्ता आणि ग्राहकांचा विश्वास हेच खरे भांडवल असते.येथे तयार होणारी प्रत्येक वस्तू उत्कृष्ट दर्जाची असावी, किंमत थोडी जास्त असली तरी चालेल, पण ग्राहकांनी अभिमानाने सांगितले पाहिजे की येथे स्वच्छता आहे, शुद्धता आहे आणि उत्तम चव आहे. स्वच्छ वातावरण, चांगली सेवा आणि प्रामाणिकपणा यामुळेच लोकांचा विश्वास जिंकता येतो.

या उपक्रमाला भविष्यात उत्तम यश मिळो, अधिकाधिक ग्राहकांचा प्रतिसाद लाभो आणि ‘चापवाला’ हे नाव गुणवत्ता व विश्वासाचे प्रतीक बनो, हीच शुभेच्छा.”कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर यांना हार आणि शाल देऊन सन्मानित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.