बोरटेंभे येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबाबत ग्रामसभा संपन्न

0

इगतपुरी :
इगतपुरी तालुक्यातील बोरटेंभे येथील ग्रामपंचायतमध्ये दि. १७ रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबाबत ग्रामसभा घेण्यात आली. सदरचे अभियान दि. १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत राबविण्यात येणार आहे. गावातील सर्व आजी-माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, भजनी मंडळ, बचत गट सदस्य, युवक मंडळ, योगेश्वर स्वाध्याय परिवार, तसेच गाव पातळीवरील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन गावाला सदर अभियानाचे बक्षीस मिळवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन ग्रामपंचायत अधिकारी समाधान सोनवणे व प्रशासक रवींद्र विठ्ठल अहिरे यांनी केले आहे.

या ग्रामसभेला सोनू आडोळे, उत्तम भडांगे, बचत गटातील सर्व महिला सदस्य, ग्रामसंघ अध्यक्ष, सचिव कर्मचारी, अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी समाधान सोनवणे व ग्रामपंचायत कर्मचारी अंशुमन आडोळे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.