गोवर्धने कनिष्ठ महाविद्यालयात पालक -शिक्षक सहविचार सभा मोठ्या उत्साहात संपन्न
इगतपुरी |
इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कनिष्ठ महाविद्यालयात पालक-शिक्षक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी पालक-शिक्षक संघ सदस्य व पदाधिकारीची निवड सभेचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ.किरण रकिबे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली यात पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर खातळे व सह-सचिव म्हणून मेघा क्षीरसागर तर सचिव म्हणून प्रा.संजय फाकटकर यांची खेळीमेळीच्या वातावरण निवड करण्यात आली.
सहविचार सभेची सुरूवात सरस्वतीच्या पुजनाने व महाराष्ट्र गीताने झाली. रामनाथ गुळवे, अॅड.यशवंत कडू, रावसाहेब खातळे, जिजाताई नवले यांचे पालकांच्या वतीने मनोगते झाली. त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध असलेल्या पायाभूत सुखसोयी, डिजिटल शैक्षणिक साधने या बद्दल समाधान व्यक्त करून विद्यार्थांच्या येण्या-जाण्याच्या वेळी परिवहन महामंडळाच्या बसच्या फे-या वाढविण्याविषयी महाविद्यालयाने प्रयत्न करावा अशी अपेक्षा व्यक्ती केली. तर उपस्थितांना महाविद्यालयाचे प्राचार्य व सदर सभेचे अध्यक्ष डाॅ.किरण रकिबे यांनी महाविद्यालयात विद्यार्थांच्या शैक्षणिक विकासात बरोबरच शारीरिक व मानसिक विकासाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
मुलींच्या सुरक्षिततेसाठी शासनाच्या निर्देशानुसार केलेल्या विविध उपाय योजनांची माहीती दिली. यात प्रामुख्याने महाविद्यालयाच्या परिसरात सी.सी.टिव्ही उभारणी, काॅलेजच्या प्रवेशद्वाराची व परिसरातील भिंतीची भरभक्कम उभारणी, पोलीस व्हॅनची अधूनमधून पाहणी याद्वारे विद्यार्थांच्या व मुलींच्या संरक्षणासाठी मजबूत पावले उचली जात असल्याचे सांगितले यासाठी संस्था व पालक संचालक अॅड.संदिपभाऊ गुळवे यांचे सहकार्य व मार्गदर्शन सतत लाभत असते असे प्रतिपादन केले. या प्रसंगी २०२४ चा लोकमत वृत्त समूहाचा गुरूवर्य पुरस्कार प्रा.संजय फाकटकर यांना मिळाल्याबद्दल पालक-शिक्षक संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सहविचार सभेचे यशस्वी नियोजन पर्यवेक्षक प्रा.राकेश गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन श्रीमती अर्चना पाटील तर आभारप्रदर्शन प्रा.राकेश गायकवाड यांनी केले. सहविचार सभा यशस्वितेसाठी प्रा.गंगाधर कोल्हे, प्रा.अरूण वाघ, प्रा.नामदेव शेजवळ, प्रा.भरत जाधव, प्रा.महेश निकम, श्रीमती सुनिता बेनाडे, सविता काळे, शितल थेटे , चंद्रकांत खातळे, महेश उगले यांनी प्रयत्न केले.