पुरस्कार मिळतो तेव्हा स्फुर्ती आणि कार्य वेगवान होऊन समाज क्रांती घडते – गोरख बोडके

0

इगतपुरी : | 
पुरस्कार मिळतो तेव्हा स्फुर्ती आणि कार्य वेगवान होऊन समाज क्रांती घडते. सामाजिक प्रेरणा बळावुन उपेक्षीतांपर्यंत पोहचण्याची गती प्राप्त होऊन विकासाची निती मुल्य जोपासली जातात असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांनी केले. निसर्गाने बहरलेल्या आणि पर्यटन क्षेत्र विकसित होणाऱ्या इगतपुरी तालुक्याला रोजगार मिळावा व भौगोलीक, आर्थिक विकास होऊन तालुक्याचा कायापालट व्हावा या उद्देशाने प्रग्या फिल्मच्या वतीने उद्योजक व सह्याद्री गौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता त्या प्रसंगी गोरख बोडके बोलत होते. या प्रसंगी शहराच्या विकासाला योगदान लाभलेल्या काही उद्योजक व सामाजिक, राजकीय, अधिकारी वर्गातील मान्यवरांचा साईबाबा ज्यांना आई मानायचे त्या बायजाबाई कोते यांचे वंशज निलेश कोते पाटील यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, शाल, पुष्प, देवुन गौरव करण्यात आला. इगतपुरी पर्यटन क्षेत्राचा विकास साधतांना पर्यटकांचा ओघ वाढुन येथील रोजगार, व्यवसाय आदी विकासाला चालना मिळावी या उद्देशाने प्रग्या फिल्मस् च्या वतीने हा पुरस्कार प्रत्येक वर्षी दिला जातो अशी माहिती प्रग्या फिल्मचे निर्माता निर्देशक पोपट गवांदे व सह निर्माता, गितकार राजेंद्र नेटावटे यांनी दिली.

मानस लाईफ स्टाईल रिसॉर्ट येथे संपन्न झालेल्या पुरस्कार सोहळयात उद्योजक व सह्याद्री पुरस्कार्थी श्री. साईबाबांचे भक्त तथा पाटील ( बायजामाईचे वंशज ), आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार हेमंत गोडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, उपविभागीय पोलीस अधिकारी हरीष खेडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीकक राजु सुर्वे, तहासिलदार अभिजित बारावकर, संकल्प लँड मार्कचे संस्थापक उत्तम ( आप्पा ) शिंदे, पोलीस निरिक्षक राहूल तसरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ आढाव, दिपक बिल्डर्सचे संस्थापक दिपक चंदे, युवा नेते समाधान बोडके, युवा नेते संजय खातळे, उद्योजक योगेश मालपाणी, अमर वालेचा, अखिल भारतीय आदिवासी सेना संस्थापक अध्यक्ष दि. ना. उघाडे, उद्योजक किशोर कृपलानी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदिप इंगोले, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता नितीन घोडके, उद्योजक मदन चोरडीया, जैन समाज संघपती अध्यक्ष नंदकुमार शिंगवी, उद्योजक कुशल टन्ना, दत्तात्रय गभाले, मोरया डिझाईन संस्थापक सदानंद आडोळे, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर, रिपाईचे प्रदेश नेते राजेंद्र गुप्ता, फायर ब्रिगेड चिफ हरिश चौबे, आर. के. डेकोरेटर्स संचालक प्रमोद भडांगे, उद्योजक घनश्याम रावत, फायर ट्रेनी इन्स्पेक्टर अमोल सोनवणे आदी मान्यवरांचा सन्मान चिन्ह देवुन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी इगतपुरी पत्रकार संघातील सर्व पत्रकारांचा साईमुर्ती, साई डायरी, शाल, साई प्रसाद देवुन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरवात साई भजन व भक्ती गित संगीताने करण्यात आली. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. आयोजक प्रग्या फिल्मस् चे निर्माता निर्देशक पोपट गवांदे, सह निर्माता गितकार राजेंद्र नेटावटे यांनी इगतपुरी विकासासाठी अनेक संकल्प राबवुन विकासाला गती कशी मिळेल या बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन राष्ट्रपती पदक विजेत्या अश्विनी सर्डीकर व तालुका भुषण विजय कर्डक यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.