दिवाळीपूर्वीच जळगावमध्ये सोन्या पाठोपाठ चांदी दर विक्रमी पातळीवर
जळगाव । दिवाळीला अवघे काही दिवस उरले असताना सोन्यासह चांदी दरात सुरु असलेली वाढ काही थांबत नाहीय. आज सोमवारी देखील सोन्यासह चांदी दरात वाढ झालीय. यामुळे ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली.
जळगावच्या बाजारात सोन्यापाठोपाठ चांदीचे दर विक्रमी पातळीवर गेले आहेत. चांदीच्या दरात मागील आठ दिवसांमध्ये २५ हजार रुपयांची मोठी भाववाढ झाली आहे. आज सोमवारी चांदी दरात तब्बल ५ हजार रुपयाची वाढ झाली आहे. यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो १ लाख ८५,००० वर जाऊन पोहोचले आहे. आठ दिवसांमध्ये चांदीत २५ हजार रुपयाची मोठी भाव वाढ झाली असून दिवसेंदिवस चांदी ही वाढली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे टेरिफ रेट धोरण व अमेरिकन बँकांचे व्याजदर कुठेतरी कमी झाले असून गुंतवणूकदार हे सोन्या-चांदीकडे वळल्यामुळे सातत्याने भाववाढ होत आहे.
आज सोमवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा ६१८ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याने शनिवारचा उच्चांक मोडीत काढून एक लाख २८ हजार ३३८ रूपयांचा नवीन उच्चांक प्रस्थापित केला.