जळगावात कोट्यवधी रुपये किंमतीचे सोने आणि चांदी जप्त

0

जळगाव । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यास आता एक दिवस राहिला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचे पथक अधिकच सक्रीय झाले आहे. यातच जळगावात कोट्यवधी रुपये किंमतीचे सोने आणि चांदी जप्त करण्यात आली आहे.

जळगावात पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच कोटी ५९ लाख ६१ हजाराचे सोने-चांदीचे दागिने जप्त केले आहे. जळगावातील रेमंड चौकात स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांनी नाकाबंदी करत ही कारवाई केली. कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालमध्ये चार किलो सोने व ३४ किलो चांदीचा समावेश आहे. जळगाव शहरातील तीन सराफ व्यावसायिकांचे हे सोने-चांदी असल्याचे सांगण्यात येत आहे.

या ऐवजाचा पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. पोलिसांनी इन कॅमेरा संपूर्ण प्रक्रिया करून हा साठा कोषागार कार्यालयात पाठविला आहे. जप्त केलेल्या मालाचे कागदपत्रे वाहन चालकाकडे होते. मात्र त्यात इतर आवश्यक कागदपत्रे नसल्याने हा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.